UPI Pin : तुम्ही युनिफाइड पेमेंट इंटरफेस अर्थात UPI वापरत असल्यास तुमचा UPI पिन वेळोवेळी बदलला पाहिजे. त्यामुळे फसवणूक होण्याची शक्यता कमी होते. UPI पिन डेबिट कार्डद्वारे तसेच डेबिट कार्डशिवाय देखील बदलता येतो. मात्र, तुमच्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे. पूर्वी यूपीआय पिन बदलण्यासाठी डेबिट कार्ड अनिवार्य होते. मात्र, आता नॅशनल पेमेंट कार्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने आधारच्या मदतीने UPI Pin सेट करण्यास परवानगी दिली आहे.
आधार कार्डद्वारे सेट करा UPI PINआधार कार्डद्वारे यूपीआय पिन सेट करण्यासाठी तुमचा मोबाईल नंबर आधार कार्डला लिंक असणे आवश्यक आहे. यासोबत तुमचा हाच मोबाईल नंबर बँकेतही रजिस्टर असायला हवा. जर आधार आणि बँकेत समान मोबाईल क्रमांक लिंक नसेल तर या सुविधेचा लाभ तुम्हाला घेता येणार नाही.
- सर्वप्रथम तुम्हाला UPI ॲपवर जाऊन तुमच्या बँक खात्याचे तपशील सबमिट करावे लागतील.
- यानंतर, तुमच्या बँक खात्यासाठी UPI पिन सेट करण्याचा पर्याय निवडा.
- यानंतर तुम्हाला दोन पर्याय दिसतील. पहिले डेबिट कार्ड आणि दुसरे आधार OTP.
- तुम्हाला आधार OTP द्वारे UPI पिन सेट करण्याचा पर्याय निवडावा लागेल.
- यानंतर, तुमच्या आधार क्रमांकाचे पहिले ६ अंक टाकून तुमचा आधार क्रमांक व्हेरिफाय करा.
- यानंतर, तुमच्या बँक खात्यात नोंदणीकृत मोबाइल नंबरवर एक वन टाईम पासवर्ड (OTP) येईल, जो तुम्हाला एंटर करून व्हेरिफाय करावा लागेल.
- यानंतर तुम्हाला नवीन UPI पिन सेट करण्याचा पर्याय मिळेल. अशा प्रकारे, तुम्ही डेबिट कार्डशिवायही UPI पिन सेट करू शकता.
यूपीआय ट्राझक्शन लिमिट वाढवलेभारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांच्या नेतृत्वाखाली ७ ते ९ ऑक्टोबर दरम्यान चलनविषयक धोरणाची बैठक झाली. या बैठकीत RBI ने UPI Lite ची प्रति व्यवहार मर्यादा ५०० रुपयांवरून १००० रुपये प्रति व्यवहार केली आहे. यासोबत UPI Lite Wallet ची सध्याची मर्यादा २००० रुपयांवरून ५००० रुपये करण्यात आली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने UPI 123PAY प्रति व्यवहार मर्यादा ५,००० रुपयांवरून १०,००० रुपये केली आहे. याशिवाय UPI द्वारे कर भरण्यासह काही व्यवहारांसाठी ५ लाख रुपयांपर्यंतची मर्यादा लागू करण्यात आली आहे.