Lokmat Money > बिझनेस न्यूज > 'हा' व्यवसाय सुरू केल्यास होईल लाखोंची कमाई, सरकारही करेल मदत! 

'हा' व्यवसाय सुरू केल्यास होईल लाखोंची कमाई, सरकारही करेल मदत! 

Business Idea: देशातील मोठमोठ्या रेस्टॉरंटपासून ते स्ट्रीट फूड शॉपमध्येही ते मोठ्या प्रमाणात वापरले जाते. त्यामुळे टिश्यू पेपर निर्मितीच्या व्यवसायात अधिक वाव आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2022 10:37 PM2022-09-30T22:37:49+5:302022-09-30T22:38:20+5:30

Business Idea: देशातील मोठमोठ्या रेस्टॉरंटपासून ते स्ट्रीट फूड शॉपमध्येही ते मोठ्या प्रमाणात वापरले जाते. त्यामुळे टिश्यू पेपर निर्मितीच्या व्यवसायात अधिक वाव आहे.

how to start napkin paper manufacturing business government provide mudra loan know the details | 'हा' व्यवसाय सुरू केल्यास होईल लाखोंची कमाई, सरकारही करेल मदत! 

'हा' व्यवसाय सुरू केल्यास होईल लाखोंची कमाई, सरकारही करेल मदत! 

आजकाल मोठ्या संख्येने लोक स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत. लघुउद्योग (Small Business) सुरू करण्यासाठी शासनाकडून मदत केली जात आहे. जर तुम्ही तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही पेपर नॅपकिनचे उत्पादन युनिट स्थापन करून चांगले उत्पन्न मिळवू शकता. नॅपकिन (टिश्यू पेपर) ही एक अशी वस्तू आहे, जी जगभरात मोठ्या प्रमाणावर वापरली जाते. देशातील मोठमोठ्या रेस्टॉरंटपासून ते स्ट्रीट फूड शॉपमध्येही ते मोठ्या प्रमाणात वापरले जाते. त्यामुळे टिश्यू पेपर निर्मितीच्या व्यवसायात अधिक वाव आहे.

सध्या टिश्यू पेपरचा वापर वाढला आहे. रेस्टॉरंट्स आणि ढाबे आता शहरांमध्ये विस्तारत आहेत आणि टिश्यू पेपरचा मोठ्या प्रमाणात वापर येथे होतो. अशा परिस्थितीत जितकी जास्त रेस्टॉरंट आणि ढाबे उघडतील तितकी टिश्यू पेपरची मागणी वाढेल. यामुळे तुम्ही ते बनवण्याचा व्यवसाय सुरू करून चांगले पैसे कमवू शकता. टिश्यू पेपरच्या वाढत्या वापरामुळे, प्लांट उभारणे तुमच्यासाठी फायदेशीर सौदा ठरू शकते. तुम्ही त्याचे उत्पादन करून तुमच्या जवळच्या बाजारात पुरवठा करून चांगला नफा मिळवू शकता.

किती येईल खर्च?
इंडियामार्टवर असलेल्या पुरवठादारांच्या मते, नॅपकिन पेपर बनविण्याचे मशीन 5 लाख रुपयांपासून सुरू होते. सेमी ऑटोमॅटिक मशीन घेतल्यास ते 5 ते 6 लाख रुपयांना मिळेल. त्यांची चार ते पाच इंची टिश्यू पेपर बनवण्याची क्षमता दर तासाला 100 ते 500 तुकडे आहे. जर तुम्हाला मोठ्या प्रमाणावर व्यवसाय सुरू करायचा असेल, तर अधिक क्षमतेचे पूर्ण ऑटोमॅटिक मशीन 10-11 लाख रुपयांमध्ये येईल. दर तासाला 2,500 रोल बनवण्याची क्षमता असते.

लहान प्लांटपासून करू शकता सुरूवात
आपण एका लहान प्लांटपासून टिश्यू पेपर बनवण्याचे देखील सुरू करू शकता. एका लहान प्लांटमधून एका वर्षात 1.50 लाख किलोपर्यंत टिश्यू पेपरचे उत्पादन सहज करता येते. अशा प्रकारे, आपण एका वर्षात सुमारे 1 कोटी रुपयांची उलाढाल (Turnover) सहज साध्य करू शकता. कच्चा माल, यंत्राचा खर्च आणि कर्जाचे हप्ते काढले तरी पहिल्या वर्षीच या व्यवसायातून 10-12 लाख रुपयांची बचत होऊ शकते.

मिळू शकते कर्ज
या व्यवसायासाठी तुम्ही स्वत: 3.50 लाख रुपये उभे केले तर तुम्हाला सरकारच्या मुद्रा योजनेंतर्गत (Mudra Scheme) कर्जही मिळू शकते. एवढे पैसे जमवल्यानंतर तुम्ही मुद्रा योजनेत कर्जासाठी अर्ज करू शकता. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी, तुम्ही 3.10 लाख रुपयांचे मुदत कर्ज आणि 5.30 लाख रुपयांचे खेळते भांडवल कर्ज (Working Capital Loan) मिळवू शकता. अशा प्रकारे तुम्ही तुमचा व्यवसाय सहज सुरू करू शकता. देशातील तरुणांना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहित करण्यासाठी केंद्र सरकार प्रधानमंत्री मुद्रा योजना (PM Mudra Yojana) राबवत आहे. या योजनेंतर्गत ग्रामीण भागात बिगर कॉर्पोरेट लघुउद्योग सुरू करण्यासाठी किंवा त्यांचा विस्तार करण्यासाठी 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज (Mudra Yojana Loan) दिले जात आहे.

Web Title: how to start napkin paper manufacturing business government provide mudra loan know the details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.