चंद्रकांत दडस, उपसंपादक
मुलांमधील आर्थिक साक्षरता त्यांना केवळ पैशाबद्दल योग्य समज देत नाही तर भविष्यातील आर्थिक आव्हानांना तोंड देण्यासही सक्षम करते. यामुळे त्यांच्या ज्ञान आणि कौशल्यातही भर पडते. लहान मुलांमधील ही समज त्यांना भविष्यात चांगल्या आर्थिक सुरक्षिततेकडे घेऊन जाते. मुलांचे आर्थिक ज्ञान कसे वाढवायचे ते जाणून घ्या.
हे का महत्त्वाचे आहे?
लहान वयातच आर्थिक साक्षरता मुलांना योग्य वेळी योग्य आर्थिक निर्णय घेण्यास सक्षम करते. हुशारीने पैशांचे नियोजन केल्याने भविष्यात बचत कशी करायची हे शिकता येते. त्यामुळे आपली मुले भविष्यात आर्थिकदृष्ट्या इतरांवर अवलंबून राहणार नाहीत.
कर्जमुक्त जीवन
बजेट आणि बचतीचे ज्ञान मुलांना मोठे झाल्यावर कर्जापासून दूर राहण्याचे कौशल्य देते. कर्जाशी संबंधित मोठे तोटे आहेत हे त्यांना समजणे सोपे होते. ते आहे त्या स्थितीत रहायला शिकतात. कर्ज न घेता संकटावर मात करतात.
मॅनेजमेंट स्किल
आर्थिक साक्षरता सखोल आकलन करण्यास सक्षम करते. बाजारात पैसा कसा पसरतो हेही यामुळे समजते. यामुळे मुलांना जोखीम व्यवस्थापन कौशल्य मिळते आणि त्यांना त्यांच्या मालमत्तेचे संरक्षण कसे करायचे हे समजते.
पुढील पिढीवरही परिणाम
ही शिकवण आर्थिक अस्थिरतेचे चक्र तोडून टाकते. मुले स्वत: अभ्यासू असतील तर ती त्यांच्या मुलांनाही आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि साक्षर बनण्यास मदत करतील.
तणाव कमी होतो
सामान्य लोकांमध्ये आर्थिक ताण खूप सामान्य आहे. जर मुलांमध्ये आधीच आर्थिक साक्षरता असेल तर ते केवळ तणावाचे उत्तम व्यवस्थापन करू शकत नाहीत तर आर्थिक कारणांमुळे होणारा ताण टाळू शकतात.
व्यवसाय गुण
जी मुले लहानपणापासूनच आर्थिक ज्ञान समजून घेण्यास सुरुवात करतात त्यांच्यामध्ये व्यवसायाच्या संधी शोधण्याचे गुण विकसित होतात. आर्थिक निर्णयांचे काय परिणाम होतील हे मुलांना लहानपणापासूनच समजते.