Join us

जीएसटीमध्ये व्यापार कसा करावा?

By admin | Published: May 01, 2017 1:17 AM

प्रत्येक व्यापाऱ्याला जीएसटीत व्यापार करण्याची कला अवगत करून घ्यावी लागेल. लहान व्यापाऱ्यांना कम्प्युटर अकाउंटिंग स्वॉफ्टवेअर, जीएसटी सुविधा प्रोव्हिडर, इंडरनेट

रिटर्न दाखल करावयाच्या पद्धतीतून व्यापाऱ्याने काय बोध घ्यावा?प्रत्येक व्यापाऱ्याला जीएसटीत व्यापार करण्याची कला अवगत करून घ्यावी लागेल. लहान व्यापाऱ्यांना कम्प्युटर अकाउंटिंग स्वॉफ्टवेअर, जीएसटी सुविधा प्रोव्हिडर, इंडरनेट, इत्यादी यंत्रणा अद्यावत ठेवावी लागेल. खरेदी व विक्रीची माहिती नियमित ठेऊन अकाउंटिंग करणे अती आवश्यक झाले आहे. यामध्ये दिंरगाई झाली, तर व्यापार करणे अवघड होईल. कारण विक्रीची माहिती अद्यावत नसेल, तर खरेदीदाराला त्याचा के्रडिट मिळणार नाही. त्यामुळे ग्राहक पुन्हा खरेदी करायला त्याच्याकडे येणार नाही, तसेच जर खरेदीची माहिती अद्यावत नसेल, तर मिळालेला आयटीसी योग्य आहे की नाही. हे तपासता येणार नाही व याचा भुर्दंड अधिक जीएसटी भरावा लागू शकतो. प्रत्येक व्यापाऱ्याने कायदा पालन करणाऱ्या व्यक्तीसोबतच व्यवहार करावा.अर्जुन (काल्पनिक पात्र) : कृष्णा, अप्रत्यक्ष कर कायद्यातील सर्वांत मोठा बदल जीएसटी १ जुलै २०१७ पासून येणार आहे. मोठ्या व्यापाऱ्यापासून ते लहान व्यापाऱ्यापर्यंत सर्वांना हा कायदा लागू होणार आहे. तर जीएसटीमध्ये व्यापार कसा होईल?कृष्ण (काल्पनिक पात्र) : अर्जुना, सध्या आपल्या देशात अनेक अप्रत्यक्ष कर कायदे आहेत. सर्वांच्या तरतुदी, रिटर्न दाखल करण्याचे प्रकार वेगवेगळे आहे. जीएसटीला ‘एक देश एक कर’ असे संबोधले जाते. अनेकांना सुरुवातीला हा जीएसटी कायदा खूप अवघड व किचकट वाटत आहे. जीएसटी हा पूर्णपणे तंत्रज्ञानावर अवलंबून आहे. यामध्ये पेपर वर्क कमी होणार व आॅनलाइन ट्रान्झॅक्शन जास्त होईल. व्यापाऱ्याने जीएसटीत कसे वागावे व दक्षता घ्यावी हे पाहू या!अर्जुन : कृष्णा, जीएसटीमध्ये व्यापाऱ्याला किती रिटर्न दाखल करावे लागतील?कृष्ण : अर्जुना, जीएसटीमध्ये प्रत्येक व्यापाऱ्याला दर महिन्याला तीन रिटर्न दाखल करावे लागतील. याचा अर्थ वर्षाचे ३६ रिटर्न व वार्षिक एक रिटर्न असे एकून ३७ रिटर्न दाखल करावे लागतील. जर विविध राज्यात नोंदणीकृत असेल, तर त्याचे ३७ रिटर्न प्रती राज्य दाखल करावे लागेल. जर कोणत्याही महिन्यात व्यवहार नसेल, तर व्यापाऱ्याला नील रिटर्न दाखल करणे आवश्यक आहे. तीन रिटर्न म्हणजे जीएसटीआर-१ विक्रीचा (आउटवर्ड सप्लाय), जीएसटीआर-२ खरेदीचा (इनवर्ड सप्लाय), जीएसटीआर-३ फायनल रिटर्न (ओरिजनल रिटर्न).अर्जुन : कृष्णा, रिटर्न दाखल करण्याची प्रक्रिया उदाहरणाद्वारे समजावून सांग, दर महिन्याचा पहिला रिटर्न कसा व कधी दाखल करावा?कृष्ण : अर्जुना, एका उदाहरणाद्वारे रिटर्नची प्रक्रिया समजावून घेऊ या. लव हा नोंदणीकृत रेडीमेड कपड्यांचा होलसेल विक्रेता आहे व कुश हा नोंदणीकृत रिटेल कपड्यांचा विक्रेता आहे. जर ‘कुश’ने ३ जुलै, ८ जुलै व २० जुलै व २० जुलैला ‘लव’कडून रेडीमेड कपडे विकत घेतले. ‘लव’ने टॅक्स इन्वाइस ‘कुश’ला दिला. आता जुलै महिना संपल्यानंतर, ‘लव’ला १० आॅगस्टपर्यंत फॉर्म जीएसटीआर-१ मध्ये जुलै महिन्याच्या विक्रीची माहिती नमूद करून रिटर्न दाखल करावे लागेल. ‘लव’ला प्रत्येक बिलाप्रमाणे माहिती म्हणजेच जीएसटीएन नंबर, बिलाची तारीख व नंबर, क्वांटीटी, दर, एकूण रक्कम व जीएसटीची माहिती घ्यावी लागेल.अर्जुन : कृष्णा, आता खरेदीचा रिटर्न कसा व कधी दाखल करावा?कृष्ण : अर्जुना, १० तारखेपर्यंत दाखल केलेली विक्रीची माहिती प्रत्येक खरेदी करणाऱ्याला दिसेल. म्हणजेच ‘कुश’ ला त्याने ‘लव’कडून बिलाअनुसार खरेदी केल्याची माहिती जीएसटीएन वर दिसेल. ‘कुश’ला ती प्रत्येक बिलाप्रमाणे माहिती म्हणजेच जीएसटीएन नंबर, बिलाची तारीख व नंबर, क्वांटीटी, दर, एकूण रक्कम व जीएसटी जुळवून घ्यावी लागेल. जर ती योग्य असेल, तर मान्य करून जीएसटीआर-२, १५ आॅगस्टपर्यंत दाखल करावे लागेल. जर काही बदल असेल, म्हणजेच जर ‘लव’ ने ३ जुलै व ८ जुलैचे बिल नमूद केले, परंतु २० जुलैचे बिल नमूद करणे राहिले, तर २० जुलैच्या बिलाची माहिती कुशला नमूद करून जीएसटीआर-२, १५ आॅगस्टपर्यंत जीएसटीएनवर दाखल करावा लागेल. खरेदी जुळल्यास पूर्ण क्रेडिट (इनपूट टॅक्स क्रेडिट) ‘कुश’ला मिळेल.अर्जुन : कृष्णा, जीएसटीआर-२ ‘कुश’ने दाखल केल्यानंतर लवला काय करावे लागेल?कृष्णा : अर्जुना, जर ‘कुश’ने काही बिलाची माहिती बदल करून किंवा अधिक जीएसटीआर-२मध्ये दाखल केली असेल, तर ‘लव’ ला ते बदल जीएसटीएनवर दिसतील. ‘लव’ला २ दिवसांच्या आत म्हणजेच १७ आॅगस्टपर्यंत तपासून बदल मान्य किंवा अमान्य करावे लागेल. जर ‘लव’ला त्याची चूक असेल व ती मान्य असेल, तर रिव्हाइज जीएसटीआर-१, १७ तारखेपर्यंत दाखल करावा लागेल. अशाने ‘लव’ आणि ‘कुश’ची खरेदी व विक्री तंतोतंत जुळेल.अर्जुन : कृष्णा, जीएसटीआर-३ कसा व कधी दाखल करावा?कृष्ण : अर्जुना, जीएसटीएनला मिळालेल्या माहितीच्या आधारे जीएसटीआर-३ अ आपोआप तयार होईल व ‘लव’ व ‘कुश’ या दोघांना तो दिसेल. यानंतर, दोघांना खरेदी, विक्री, घेतलेला आयटीसी नमूद करून जीएसटीआर-३, २० आॅगस्टपर्यंत दाखल करावा लागेल. जीएसटीआर-३ मध्ये देय जीएसटीप्रमाणे ‘लव’ला जीएसटी २० तारखेला भरावा लागेल.अर्जुन : कृष्णा, जर आयटीसी (इनपूट टॅक्स क्रेडिट) जुळला नाही, तर काय होईल?कृष्ण : अर्जंुना, जर आयटीसी जुळला नाही, म्हणजेच विक्रेत्याने कमी विक्री व खरेदीदाराने जास्त खरेदी दर्शविली व त्यामुळे जीएसटी, आयटीसीमध्ये फरक असेल, तर जीएसटीएन आयटीसी रिपॉट देईल. या फरकावर ‘कुश’ला त्याच महिन्यात जीएसटी व्याजासोबत भरावा लागेल.अर्जुन : कृष्णा, जर आॅगस्ट महिन्यामध्ये ‘लव’ने जीएसटी भरला नाही किंवा चूक दुरुस्ती केली नाही, तर काय होईल?कृष्ण : अर्जुना, जर ‘लव’ ने जुलै महिन्याचा जीएसटी भरला नाही किंवा चूक दुरुस्ती केली नाही, तर ‘कुश’ला आॅगस्टमध्ये तफावतीची नोटीस मिळेल व ‘कुश’चा आयटीसी कमी होऊन २० सप्टेंबरपर्यंत जीएसटी आणि जुलैपासूनचा व्याज भरावा लागेल.अर्जुन : कृष्णा, ‘लव’ यांना खरेदी-विक्रीतील चूक कधीपर्यंत दूर करता येईल?कृष्ण : अर्जुना, ‘लव’ व ‘कुश’ यांना खरेदी विक्री तील तफावत दूर करावयास आर्थिक वर्ष संपल्यापासून ६ महिने अर्थात, ३० सप्टेंबर किंवा वार्षिक रिटर्न जे आधी त्या तारखेपर्यंत दुरुस्त करण्याची शेवटची संधी मिळेल.सी. ए. उमेश शर्मा