Lokmat Money > बिझनेस न्यूज > EPFO पोर्टलवर सहजरित्या करू शकता ऑनलाईन  PF ट्रान्सफर; जाणून घ्या, संपूर्ण प्रोसेस... 

EPFO पोर्टलवर सहजरित्या करू शकता ऑनलाईन  PF ट्रान्सफर; जाणून घ्या, संपूर्ण प्रोसेस... 

PF Online Transfer : नोकरी बदलताना तुम्हाला तुमच्या जुन्या EPF खात्यातून नवीन कंपनीच्या EPF खात्यात पैसे ट्रान्सफर करावे लागतील, जेणेकरून तुम्हाला PF च्या एकूण रकमेवर अधिक व्याज मिळेल.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2021 10:12 AM2021-09-15T10:12:27+5:302021-09-15T10:17:24+5:30

PF Online Transfer : नोकरी बदलताना तुम्हाला तुमच्या जुन्या EPF खात्यातून नवीन कंपनीच्या EPF खात्यात पैसे ट्रान्सफर करावे लागतील, जेणेकरून तुम्हाला PF च्या एकूण रकमेवर अधिक व्याज मिळेल.

how to transfer your pf account online via epfo portal check process details here | EPFO पोर्टलवर सहजरित्या करू शकता ऑनलाईन  PF ट्रान्सफर; जाणून घ्या, संपूर्ण प्रोसेस... 

EPFO पोर्टलवर सहजरित्या करू शकता ऑनलाईन  PF ट्रान्सफर; जाणून घ्या, संपूर्ण प्रोसेस... 

नवी दिल्ली :  जर तुम्ही कर्मचारी भविष्य निधी संघटनेचे (EPFO) सदस्य असाल तर तुम्ही पीएफ ऑनलाईन ट्रान्सफर (PF Online Transfer) करू शकता. नोकरी बदलताना तुम्हाला तुमच्या जुन्या EPF खात्यातून नवीन कंपनीच्या EPF खात्यात पैसे ट्रान्सफर करावे लागतील, जेणेकरून तुम्हाला PF च्या एकूण रकमेवर अधिक व्याज मिळेल.

तुम्ही घर बसल्या PF चे पैसे ऑनलाईन ट्रान्सफर करू शकता...
- सर्वप्रथम EPFO वेबसाइटवर UAN नंबर आणि पासवर्ड वापरून लॉग इन करा.
- EPFO वेबसाइटवर ऑनलाइन सर्व्हिसवर जा आणि एक सदस्य EPF खाते निवडा.
-  याठिकाणी पुन्हा तुमचा UAN नंबर टाका किंवा तुमचा जुना EPF सदस्य आयडी टाका. यामुळे तुम्हाला तुमच्या खात्याबद्दल सर्व माहिती मिळेल.
- त्यानंतर ट्रान्सफर व्हेरिफाय करण्यासाठी आपली जुनी किंवा नवीन कंपनी निवडा.
-  आता जुने खाते निवडा आणि OTP जनरेट करा.
- OTP अपलोड केल्यानंतर मनी ट्रान्सफरचा ऑप्शन सुरू होईल.
- ट्रॅक क्लेम स्टेटस मेनूमधील तुम्ही ऑनलाइन स्थिती पाहू शकाल.

नव्या कंपनीत अर्जाची सेल्फ अटेस्टेड कॉपी द्या...
ऑनलाईन अर्ज सादर केल्याच्या 10 दिवसांच्या आत निवडलेल्या कंपनीला किंवा संस्थेला पीडीएफ फाइलमध्ये ऑनलाईन पीएफ ट्रान्सफर अर्जाची सेल्फ अटेस्टेड कॉपी सबमिट करा. यानंतर कंपनी ती मंजूर करेल. मंजुरी मिळाल्यानंतर, पीएफ सध्याच्या कंपनीकडे असलेल्या नवीन पीएफ खात्यात ट्रान्सफर केला जातो.


UAN-आधार लिंक करण्याची मुदत वाढवली
कर्मचारीभविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO)​​ग्राहकांना EPF खाते आधार कार्डसोबत लिंक करण्याच्या बाबतीत काही दिलासा दिला आहे. लिंक करण्याची मुदत 31 डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. आधी त्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट होती. EPFO ने सोशल मीडियाद्वारे ही माहिती दिली आहे. जर तुम्ही 31 डिसेंबर पर्यंत EPFO ​​आणि आधार नंबर लिंक केले नाही, तर तुमच्या खात्यात कंपनीकडून येणारे योगदान थांबवले जाईल. या व्यतिरिक्त, तुम्हाला ईपीएफ खात्यातून पैसे काढण्यातही अडचणी येऊ शकतात. जर EPF खातेधारकाचे खाते आधारशी जोडलेले नसेल तर ते EPFO ​​च्या सेवा वापरू शकणार नाहीत.

काय असतो UAN नंबर?
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेकडे (EPFO) नोंदणीकृत होताच, कर्मचारी या संस्थेचा सदस्य बनतो आणि यासोबत त्याला 12 अंकी UAN (युनिव्हर्सल अकाउंट नंबर) देखील जारी केला जातो. या क्रमांकाच्या मदतीने ईपीएफओच्या सुविधा ऑनलाइन वापरता येतील. यूएएन नंबरच्या मदतीने कर्मचारी केवळ त्याच्या पीएफ खात्याचे पासबुक ऑनलाइन पाहू शकत नाही, तर तो त्याचा PF(प्रोव्हिडंड फंड) बॅलन्स ऑनलाइन तपासू शकतो.
 

Read in English

Web Title: how to transfer your pf account online via epfo portal check process details here

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.