Join us

EPFO : खुशखबर! PF खातेधारक आता घरी बसून बँक डिटेल्स अपडेट करू शकतात, जाणून घ्या प्रोसेस...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2021 10:27 AM

EPFO : कर्मचारी घरी बसून यूएएनमध्ये बँक अकाउंटचे डिटेल्स अपडेट करू शकतात. तर मग तुम्ही आपल्या बँकेचे डिटेल्स कसे अपडेट करायचे, ते जाणून घ्या...

नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPFO) आपल्या खातेधारकांना घरी बसून बँक डिटेल्स अपडेट करण्याची सुविधा देत आहे. त्यामुळे तुम्ही पीएफ अकाउंटसह आपले बँक अकाउंट सहजरित्या अपडेट करू शकता. बँक अकाउंटची माहिती अपडेट केली नाही, तर तुम्ही आपल्या पीएफ अकाउंटतून पैसे काढू शकणार नाही. 

बर्‍याचदा असे घडते की, ग्राहकांनी आधीच पीएफ अकाउंटशी संबंधित बँक खाते बंद केले आहे. परंतु नवीन बँक अकाउंट हे पीएफ अकाउंटशी लिंक करण्यास विसरू नका. जर चुकीच्या बँक अकाउंटचे डिटेल्स आपल्या यूएएनशी (UAN) लिंक झाले, तर काळजी करण्याची गरज नाही. कर्मचारी घरी बसून यूएएनमध्ये बँक अकाउंटचे डिटेल्स अपडेट करू शकतात. तर मग तुम्ही आपल्या बँकेचे डिटेल्स कसे अपडेट करायचे, ते जाणून घ्या...

असे करा बँक अकाउंट डिटेल्स अपडेट... >> सर्वात आधी EPFO च्या युनिफाइड मेंबर पोर्टल https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/ वर जा.>>  याठिकाणी UAN आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा.>>  यानंतर टॉप मेन्यूमधील 'मॅनेज' ऑप्शनवर जा, त्यानंतर ड्रॉप डाऊन मेन्यूमधून 'केवायसी' निवडा.>> आता तुमची बँक निवडा आणि बँक अकाउंट नंबर, नाव आणि आयएफएससी कोड अपलोड करुन 'सेव्ह' बटनवर क्लिक करा.>> ही माहिती नियोक्ताद्वारे मंजूर झाल्यानंतर, तुमचे अपडेटेड बँक डिटेल्स अप्रूव्ह केवायसी सेक्शनमध्ये दिसतील.>> त्यानंतर आपल्या नियोक्ताला पुराव्याची कागदपत्रे द्या.

अशा प्रकारे चेक करा PF बॅलन्स...>> ईपीएफओ सदस्यांना www.epfindia.gov.in वेबसाइटवर जावे लागेल.>>  त्यानंतर 'Our Services' टॅबमधून 'For Employees' ऑप्शनवर क्लिक करा.>>  यानंतर 'Services' टॅब वरून 'Member Passbook' वर क्लिक करा.>> तुम्हाला लॉग इन करण्यासाठी तुमचा UAN आणि पासवर्ड टाकावा लागेल. त्यानंतर तुम्ही आपल्या पीएफ खात्याचे पासबुक पाहू शकाल.

टॅग्स :व्यवसायबँककर्मचारी