Lokmat Money > बिझनेस न्यूज > Waaree Energies IPO allotment status: Waaree Energiesचा IPO अलॉट झालाय का? 'इकडे' करू शकता स्टेटस चेक; पैसे दुप्पट होण्याची शक्यता

Waaree Energies IPO allotment status: Waaree Energiesचा IPO अलॉट झालाय का? 'इकडे' करू शकता स्टेटस चेक; पैसे दुप्पट होण्याची शक्यता

Waaree Energies IPO Status Check : वारी एनर्जीजच्या आयपीओ खुला होण्यापूर्वीपासूनच चर्चेचा विषय ठरला होता. आता हा आयपीओ आपल्याला अलॉट झालाय का याकडे गुंतवणूकदारांचं लक्ष लागलंय.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2024 11:41 AM2024-10-24T11:41:26+5:302024-10-24T11:41:26+5:30

Waaree Energies IPO Status Check : वारी एनर्जीजच्या आयपीओ खुला होण्यापूर्वीपासूनच चर्चेचा विषय ठरला होता. आता हा आयपीओ आपल्याला अलॉट झालाय का याकडे गुंतवणूकदारांचं लक्ष लागलंय.

how where to check Waaree Energies IPO Allotment staus bse in time india site Possibility of doubling the money know gmp | Waaree Energies IPO allotment status: Waaree Energiesचा IPO अलॉट झालाय का? 'इकडे' करू शकता स्टेटस चेक; पैसे दुप्पट होण्याची शक्यता

Waaree Energies IPO allotment status: Waaree Energiesचा IPO अलॉट झालाय का? 'इकडे' करू शकता स्टेटस चेक; पैसे दुप्पट होण्याची शक्यता

Waaree Energies IPO Status Check : वारी एनर्जीजच्या आयपीओ खुला होण्यापूर्वीपासूनच चर्चेचा विषय ठरला होता. आता हा आयपीओ आपल्याला अलॉट झालाय का याकडे गुंतवणूकदारांचं लक्ष लागलंय. वारी एनर्जीचा तीन दिवसांचा आयपीओ बुधवारी (२३ ऑक्टोबर) गुंतवणुकीसाठी बंद झाला. १९९० मध्ये स्थापन झालेली ही देशातील सर्वात मोठी सोलर पॅनेल तयार करणारी कंपनी आहे. इन्स्टिट्युशनल इनव्हेस्टर्सच्या जोरदार प्रतिसादामुळे तिसऱ्या आणि शेवटच्या दिवशी सौर पॅनेल निर्मिती करणारी वारी एनर्जीज लिमिटेडचा आयपीओ तिसऱ्या आणि शेवटच्या दिवशी ७६.३४ पट सब्सक्राइब झाला. या आयपीओसाठी १,४२७ ते १,५०३ रुपये प्रति शेअरचा प्राईज बँड निश्चित करण्यात आला होता.

काय आहेत डिटेल्स?

एनएसईच्या आकडेवारीनुसार, ४,३२१.४४ कोटी रुपयांच्या आयपीओमध्ये २,१०,७९,३८४ शेअर्सच्या ऑफरच्या तुलनेत १,६०,९१,६१,७४१ शेअर्ससाठी बोली लावण्यात आली होती. क्वालिफाईड इन्स्टिट्युशनल बायर्स (QIB) श्रेणीत २०८.६३ पट, तर नॉन इन्स्टिट्युशनल इनव्हेस्टर्स (NII) श्रेणीत कंपनीला ६२.४८ पट सबस्क्रिप्शन मिळालं. तर, किरकोळ गुंतवणूकदारांची श्रेणी (RII) १०.७९ पट सब्सक्राइब झाली. वारी एनर्जीजनx शुक्रवारी अँकर गुंतवणूकदारांकडून १,२७७ कोटी रुपये गोळा केले.

Waaree एनर्जीज आयपीओ रजिस्ट्रार लिंक

वारी एनर्जीजआयपीओ अलॉटमेंट स्टेटस रजिस्ट्रारच्या अधिकृत वेबसाइटवर आणि बीएसई वेबसाइटवर ऑनलाइन पाहता येणार आहे. लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड अधिकृत रजिस्ट्रार आहे.

अलॉटमेंट स्टेटस कसं पाहाल?

  • वारी एनर्जीजच्या आयपीओ अलॉटमेंटची घोषणा लिंक इनटाइमच्या वेबसाइट - https://linkintime.co.in/initial_offer/public-issues.html आणि बीएसईवेबसाइटवर देखील होणार आहे.
  • लिंक इनटाइमच्या वेबसाईटवर फक्त पॅन कार्ड नंबर टाकून स्टेटस चेक करता येईल.
  • वारी एनर्जीजचा आयपीओ अलॉटमेंट स्टेटस बीएसईच्या https://www.bseindia.com/investors/appli_check.aspx या अधिकृत वेबसाईटवर देखील पाहता येईल.
  • बीएसई वेबसाइटवर गुंतवणूकदारांना वारी एनर्जी आयपीओचा अर्ज क्रमांक आणि पॅन क्रमांक टाकून अलॉटमेंट स्टेटस पाहता येईल.
     

GMP काय?

वारी एनर्जीजचा आयपीओचा जीएमपी बंपर लिस्टिंग प्रॉफिट दाखवत आहे. Investorgain.com दिलेल्या माहितीनुसार, कंपनीचा जीएमपी आज 1560 रुपयांवर आलाय. म्हणजेच कंपनीचे शेअर्स ३०६३ रुपयांवर लिस्ट होऊ शकतात. म्हणजेच लिस्टिंगवर सुमारे १०३% इतका जबरदस्त नफा मिळण्याची शक्यता आहे.

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: how where to check Waaree Energies IPO Allotment staus bse in time india site Possibility of doubling the money know gmp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.