Lokmat Money > बिझनेस न्यूज > Chandrayaan 3 चे चंद्रावर पाऊल, भारतीय अर्थव्यवस्था होणार तगडी? वाचा काय असणार गणित

Chandrayaan 3 चे चंद्रावर पाऊल, भारतीय अर्थव्यवस्था होणार तगडी? वाचा काय असणार गणित

ग्लोबल स्पेस इकॉनॉमीने २०२३ ची दुसरी तिमाहीत जागतिक अंतराळ अर्थव्यवस्था ५४६ अब्ज अमेरिकन डॉलरवर पोहोचली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2023 11:14 AM2023-08-22T11:14:09+5:302023-08-22T11:14:43+5:30

ग्लोबल स्पेस इकॉनॉमीने २०२३ ची दुसरी तिमाहीत जागतिक अंतराळ अर्थव्यवस्था ५४६ अब्ज अमेरिकन डॉलरवर पोहोचली आहे.

how will chandrayaan 3 step on the moon boost indian space economy | Chandrayaan 3 चे चंद्रावर पाऊल, भारतीय अर्थव्यवस्था होणार तगडी? वाचा काय असणार गणित

Chandrayaan 3 चे चंद्रावर पाऊल, भारतीय अर्थव्यवस्था होणार तगडी? वाचा काय असणार गणित

रशियाचे लून 25 हे चंद्रयान क्रॅश झाल्यानंतर आता जगाचे लक्ष भारताच्या चंद्रयान 3 वर लागले आहे. या आठवड्याच चंद्रयान चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणार आहे. जर चंद्रयानाचे सॉफ्ट लँडिंग यशस्वी झाले तर देशाच्या अर्थव्यवस्थेत मोठा फायदा होणार आहे. देशाच्या स्पेस इकॉनॉमीतही वाढ होऊन ग्लोबल स्पेस इकॉनॉमीमध्ये देशाचा हिस्सा वाढणार आहे. ग्लोबल स्पेसची इकॉनॉमी ५५० अब्ज अमेरिकन डॉलरवर पोहोचली असून आपल्या देशाच्या स्पेसची इकॉनॉमी १० ते ११ अब्ज डॉलर आहे. जर आपले चंद्रयान 3 यशस्वी लँडिंग झाले तर आपल्या इकॉनॉमीमध्ये मोठी वाढ होणार आहे. 

ही आमच्यासाठी अखेरची संधी होती...; रशियन चंद्रयान क्रॅशचा टॉप सायंटिस्टने घेतला धसका, अ‍ॅडमीट

एका अहवालानुसार, २०१३ पासून, १,७९१ कंपन्यांमध्ये खासगी इक्विटीद्वारे २७२  अब्ज अमेरिकल डॉलरपेक्षा जास्त निधी उभारण्यात आला आहे. स्पेस फाउंडेशनने आपल्या वार्षिक अहवालात म्हटले आहे की, २०२३ च्या दुसऱ्या तिमाहीत जागतिक अंतराळ अर्थव्यवस्था आधीच ५४६ अब्ज अमेरिकन डॉलरवर पोहोचली आहे. गेल्या दशकात अवकाश अर्थव्यवस्थेत ९१ टक्के वाढ झाली आहे. भारताची अंतराळ अर्थव्यवस्था २०२५ पर्यंत १३ अब्ज अमेरिकन डॉलर्सची होण्याची अपेक्षा आहे. जे २०२० पर्यंत ९ अब्ज डॉलर्स होते. याचा अर्थ भारताच्या अंतराळ अर्थव्यवस्थेतील जागतिक वाटा कमी आहे.

यापूर्वी अंतराळ मोहिमा जगाच्या कोणत्याही देशात झाल्या आहेत. जागतिक अर्थव्यवस्थेसोबतच सर्वसामान्यांनाही याचा मोठा फायदा झाला आहे. इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर पाण्याच्या पुनर्वापरासह स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा समावेश, शिक्षण, सौर उत्पादन आणि आरोग्य तंत्रज्ञानासाठी स्टारलिंकद्वारे प्रदान केलेले जवळजवळ जागतिक इंटरनेट पोहोच. सॅटेलाइट इमेजिंग, पोझिशनिंग आणि नेव्हिगेशनसाठी जागतिक डेटाच्या वाढत्या मागणीसह, अनेक अहवाल सूचित करतात की जग आधीच अवकाश अर्थव्यवस्थेच्या वेगवान वाढीच्या टप्प्यात आहे. 

अनेक देशांनी अवकाश अर्थव्यवस्थेत प्रवेश घेतला आहे. अशा देशांनाही त्यांच्या अर्थव्यवस्थेचा आगामी काळात खूप फायदा होऊ शकतो. यासोबतच इतर देशांनाही या अर्थव्यवस्थेत येण्यासाठी सातत्याने प्रेरणा मिळत आहे. ऑस्ट्रेलियामध्ये, ऑस्ट्रेलियन सिव्हिल स्पेस स्ट्रॅटेजी २०१९-२०२८ चे उद्दिष्ट GDP मधील क्षेत्राचे योगदान तिप्पट करून १२ अब्ज इतके करणे आणि २०३० पर्यंत अतिरिक्त २०,००० नोकऱ्या निर्माण करणे हे आहे.

भारत आणि दक्षिण आशियाचे व्यवस्थापकीय भागीदार आर्थर डी. लिटल आणि बर्निक चित्रन मैत्रा यांनी नुकताच त्यांचा अहवाल सादर केला. भारतातील अंतराळावरील सरकारी खर्चात सातत्याने वाढ होत असल्याचे या अहवालात म्हटले आहे. देशातील खासगी अवकाश क्षेत्रही आपली गुंतवणूक वेगाने वाढवत आहेत. यासोबतच सरकारी धोरणे व्यावसायिक अवकाश उपक्रमांनाही प्रोत्साहन देत आहेत. त्यामुळे भारतीय अवकाश विभाग मोठ्या बदलाकडे वाटचाल करत आहे. 

Web Title: how will chandrayaan 3 step on the moon boost indian space economy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.