Join us

वस्तू व सेवा यांच्या एकत्रित पुरवठ्यावर जीएसटी कसा लागेल?

By admin | Published: June 12, 2017 12:14 AM

संयुक्त पुरवठा किंवा मिश्र पुरवठा याचा प्रत्येक व्यक्तीवर खूप मोठा परिणाम आहे. सध्याच्या कायद्यामध्ये अशी संकल्पना नव्हती.

करनीती भाग १८२ सी. ए. उमेश शर्माअर्जुन (काल्पनिक पात्र) : जीएसटीत हा संयुक्त पुरवठा व मिश्र पुरवठ्याचा काय प्रकार आहे?कृष्णा (काल्पनिक पात्र) : जीएसटीमध्ये संयुक्त पुरवठा व मिश्र पुरवठा, करपात्र पुरवठा, करमाफ पुरवठा, शून्य दर असलेला पुरवठा, सतत (कन्टीन्सुअस) पुरवठा, राज्यांतर्गत पुरवठा, आंतरराज्यीय पुरवठा इत्यादी. असे पुरवठ्याचे प्रकार आहेत. यामध्ये संयुक्त पुरवठा व मिश्र पुरवठ्याचे प्रकार खूप महत्त्वाचा आहे. वस्तू किंवा सेवा यावर जीएसटी आकारताना तो संयुक्त पुरवठा किंवा मिश्र पुरवठा कोणत्या प्रकारात मोडतो हे समजून घेणे आवश्यक आहे. संयुक्त पुरवठा म्हणजे कंम्पोझिट सप्लाय व मिश्र पुरवठा म्हणजे मिक्स सप्लाय.अर्जुन : कृष्णा, जीएसटीमध्ये मिश्र पुरवठा म्हणजे काय?कृष्ण : अर्जुना, मिश्र पुरवठा म्हणजे दोन किंवा अधिक स्वतंत्र वस्तू किंवा सेवांचा कोणत्याही संयोगाचा एखाद्या करपात्र व्यक्तीने एकाच किंमतीसाठी एकमेकांसमवेत केलेला पुरवठा होय.अर्जुन : नेमका कोणता पुरवठा मिश्र पुरवठ्यात समाविष्ट होतो?कृष्ण : अर्जुना, जर एकापेक्षा अधिक वस्तू किंवा सेवा संयुक्तपणे एका किंमतीसाठी पुरवठा केल्यास तो मिश्र पुरवठा होतो. जर प्रत्येक गोष्टीचा स्वतंत्र पुरवठा केला जाऊ शकतो किंवा कोणतीही गोष्ट दुसऱ्यावर अवलंबून पुरवठा केला जात असेल तर तो मिश्र पुरवठा समजला जाणार नाही. उदा. दिवाळीच्या दिवसांमध्ये भेटवस्तू म्हणून सुका मेव्याचा काजू, बदाम, पिस्ता, मनुके, अक्रोड इत्यादींचा एकत्रित बॉक्स विकत घेतले जातात. हा मिश्र पुरवठा होईल.अर्जुन : कृष्ण, मिश्र पुरवठ्यावर कशाप्रकारे कर आकारला जाईल?कृष्णा : अर्जुना, मिश्र पुरवठ्यामध्ये दोन किंवा अधिक पुरवठ्यांचा समावेश होतो. त्यामुळे ज्या गोष्टीचा कर दर सर्वाधिक असेल तोच दर संपूर्ण पुरवठ्याला लागू होईल. उदा. सुक्या मेव्याच्या डब्यात ज्या पदार्थांवर सर्वाधिक कर दर असेल तोच दर संपूर्ण डब्यावर लावला जाईल. वर दिलेल्या उदाहरणात सर्वाधिक जीएसटीचा दर असलेली वस्तू १२ टक्के आहे आणि त्यात काही गोष्टी शून्य टक्केच्या सुद्धा आहे. पण तरी संपूर्ण डबा १२ टक्क्यांनी करपात्र होईल. आणखी एक उदाहरण: आपण कार्पोरेट कीटचा पुरवठा के ला त्यात पेन - १२ टक्के, मनगटी घड्याळ - २८ टक्के, पाकिट - २८ टक्के आणि डायरी - १८ टक्के असेल तर कार्पोरेट कीटवर २८ टक्के कर आकारण्यात येईल.अर्जुन : कृष्णा, वस्तू किंवा सेवांचा संयुक्त पुरवठा म्हणजे काय?कृष्णा : अर्जुना, एखाद्या करपात्र व्यक्तीने त्याच्या दैनंदिन व्यवहारामध्ये प्राप्तकर्त्याचा दोन किंवा अधिक वस्तू आणि / किंवा सेवांचा कोणत्याही संयोगामध्ये एकमेकांसोबत पुरवठा केला. ज्या नैसर्गिकरित्या एकत्रित आहेत आणि ज्यांच्यातील कोणताही एक मुख्य पुरवठा आहे, त्याला संयुक्त पुरवठा म्हणतात. उदा. जर वस्तू विकताना बीलामध्ये पॅकिंग खर्च, विमा खर्च व गाडी भाडे इत्याइी नमूद केले असेल तेव्हा वस्तूंचा पॅकिंग खर्च, विमा आणि गाडी भाडे यांचा एकत्रित पुरवठा म्हणजे त्या वस्तूंचा संयुक्त पुरवठा होय. जर २४ हजार रुपयांचा टीव्ही विकला व ४०० रुपयांचे पॅकिंग खर्च व इन्स्टॉलेशन खर्च घेतला तर समिश्र पुरवठ्याच्या तरतुदीनुसार जीएसटी २४,४०० रुपयांवर लागेल. अर्जुन : संयुक्त पुरवठ्यावर कसा कर आकारला जाईल?कृष्णा : अर्जुना, संयुक्त पुरवठ्यामध्ये दोन किंवा अधिक पुरवठ्यांचा समावेश होतो. ज्यातील एक मुख्य पुरवठा असतो. तर तो संपूर्ण मुख्य पुरवठा आहे, असे समजावे आणि त्या मुख्य पुरवठ्यावर कराचा जो दर लागतो, तोच उरलेल्या गोष्टींवर आकारला जाईल. जसे वर दिल्याप्रमाणे जर वस्तूंचा पुरवठा हा मुख्य पुरवठा आहे तर त्याचाच दर संपूर्ण संयुक्त पुरवठ्याला म्हणजेच पॅकिंग खर्च, विमा आणि गाडी भाडे यांना लागू होईल.करदात्याने यातून काय बोध घ्यावा?संयुक्त पुरवठा किंवा मिश्र पुरवठा याचा प्रत्येक व्यक्तीवर खूप मोठा परिणाम आहे. सध्याच्या कायद्यामध्ये अशी संकल्पना नव्हती. खरेदी करणाऱ्याला व विक्रेत्याला ही जीएसटीमधील तरतूद समजून त्यानुसार व्यवहार करणे अति आवश्यक आहे. जर तरतुदीप्रमाणे संयुक्त किंवा मिश्र पुरवठ्याची कर आकारणी केली नाही तर शासन विक्रेत्याकडून अधिक कर, व्याज व दंड वसूल करेल. तसेच खरेदी करणाऱ्याला जर ही तरतूद लक्षात घेतली नाही तर अधिक कर भरावा लागू शकतो.