- उमेश शर्मा, सीए
अर्जुन : कृष्णा, ज्या कर्मचाऱ्यांचे उत्पन्न बेसिक एक्झम्प्शन लिमिट ओलांडते त्यांच्या वेतनावर नियोक्त्यास मूळातच करकपात (टीडीएस) करणे आवश्यक आहे. यासंबंधी आर्थिक वर्ष २०२०-२१मध्ये काय गोंधळ उडाला आहे?
कृष्ण : अर्जुना, केंद्रीय अर्थसंकल्प २०२० मध्ये वैयक्तिक (इंडिव्हिज्युअल) करदात्यांना कर भरण्यासाठी पर्याय दिला आहे. त्या अंतर्गत कलम ११५ बीएसीने कमी दराने कर भरण्याचा पर्याय दिला आहे. ज्यामध्ये करदात्यास सवलती-वजावटी घेता येणार नाही. घरभाडे भत्ता, गृह कर्जावरील व्याज आणि कलम ८० सी, ८० डी, ८० सीसीडी या अंतर्गत केलेल्या गुंतवणुकीवर सवलती-वजावटी घेता येणार नाहीत. रिटर्न भरताना पर्याय निवडावा लागेल. नियोक्ता वजावट करीत असल्याने कोणत्या योजनेअंतर्गत कर वजा करावा हा गोंधळ उडाला आहे. सीबीडीटीने गोंधळ दूर करण्यासाठी १३ एप्रिल २०२० रोजी परिपत्रक जाहीर केले आहे.
अर्जुन : कृष्णा, परिपत्रकात काय स्पष्टीकरण देण्यात आले आहे?
कृष्ण : अर्जुना, कर्मचाºयाला दरवर्षी नियोक्तयाला कोणता पर्याय निवडला आहे, ते सांगावे लागेल. त्यानंतर नियोक्त्यास एकूण उत्पन्न आणि त्यातील तरतुदीनुसार टीडीएस वजा करावा लागेल. कर्मचाºयांनी कोणता पर्याय निवडला ही माहिती फक्त टीडीएसच्या उद्देशाने असेल. त्यामध्ये वर्षात कोणताही बदल करता येणार नाही. जर, कर्मचाºयांनी अशी कोणतीही माहिती दिली नसल्यास नियोक्त्याने सामान्य किंवा जुन्या कर दराने टीडीएस वजा करावा.
अर्जुन : ज्या कर्मचाºयांचे व्यवसाय किंवा व्यावसायिक उत्पन्न आहे, त्यांना कोणता पर्याय उपलब्ध आहे?
कृष्ण : अर्जुना, व्यवसाय किंवा व्यावसायिक उत्पन्न असलेल्या कर्मचाºयांना एकदाच कर निवडण्याचा पर्याय दिला आहे. त्यानंतर पर्याय बदलता येणार नाही. म्हणून नियोक्त्यास दिलेल्या पर्यायाच्या माहितीमध्ये पुढील वर्षात बदल करु नये, असे परिपत्रकात म्हटले आहे. कलम ११५ बीएसीमध्ये मागील वर्षी निवडलेला पर्याय पुढे चालू ठेवावा.
अर्जुन : कृष्णा यातून काय बोध घ्यावा?
कृष्ण : अर्जुना, कलम ११५, बीएसी अंतर्गत नवीन कर प्रणालीबाबत सीबीडीटीने अनेक स्पष्टीकरणे दिली आहेत. कर्मचाºयांनी त्यांच्या फायद्यानुसार योग्य तो पर्याय निवडून नियोक्त्यास त्या पयार्याबाबत माहिती न विसरता द्यावी. जेणेकरून वेतनावर योग्य दराने टीडीएस वजा होईल. नियोक्त्यास सांगितलेला पर्याय आणि रिटर्न भरताना निवडलेला पर्याय जर सारखा असेल तर टीडीएस आणि आयटीआरमध्ये जास्त फरक येणार नाही. हे कर्मचाºयांसाठी फायद्याचे असेल.
>अर्जुन : कृष्णा, रिटर्न दाखल करताना एखादा कर्मचारी पर्याय बदलू शकतो का?
कृष्ण : अर्जुना, नियोक्त्यास दिलेली माहिती ही कलम १५५ बीएसीमध्ये सवलतीच्या अंतर्गत रिटर्न भरण्यास गृहीत धरली जाणार नसल्याचे परिपत्रकात स्पष्ट केले आहे. कलम १३९ (१) मध्ये रिटर्न भरताना पर्याय निवडावा लागेल. म्हणून उत्पन्नाचे रिटर्न भरताना निवडलेला पर्याय हा नियोक्त्यास सांगितलेल्या पर्यायापेक्षा वेगळा असू शकतो.
आर्थिक वर्षात कर्मचाऱ्यांच्या वेतनावरील टीडीएस कसा राहील?
- उमेश शर्मा, सीए अर्जुन : कृष्णा, ज्या कर्मचाऱ्यांचे उत्पन्न बेसिक एक्झम्प्शन लिमिट ओलांडते त्यांच्या वेतनावर नियोक्त्यास मूळातच करकपात (टीडीएस) ...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2020 03:40 AM2020-04-27T03:40:43+5:302020-04-27T03:40:52+5:30