Join us

एचएसबीसी बँकेतील ३५ हजार कर्मचाऱ्यांच्या नोकºया जाणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2020 2:49 AM

नफ्यामध्ये मोठी घट : तीन वर्षांत टप्प्याटप्प्याने करणार कपात

हाँगकाँग : खासगी क्षेत्रातील आघाडीच्या एचएसबीसी बँकेच्या जगभरातील विविध देशांत काम करणाºया तब्बल ३५ हजार कर्मचाऱ्यांच्या नोकºया येत्या तीन वर्षांत जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. ही माहिती एचएसबीसी बँकेनेच दिली आहे.

एचएसबीसी बँकेच्या नफ्यामध्ये ३३ टक्के घट झाली आहे. त्यामुळे बँकेने तीन वर्षांत ३५ हजार कर्मचाºयांना कामावरून कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. या बँकेचे हंगामी मुख्य कार्यकारी अधिकारी नोएल क्वीन यांनी सांगितले की, एचएसबीसीच्या जगभरातील शाखांमध्ये काम करणाºया कर्मचाºयांना कमी करण्याचे आम्ही ठरविले आहे. ही संख्या ३५ हजार वा त्याहून कदाचित अधिक असू शकेल.जगभरात या बँकेचे २ लाख ३५ हजार कर्मचारी आहेत. त्यापैकी ३५ हजार जणांना कमी करून कर्मचाºयांची संख्या दोन लाखांवर आणण्याचे बँकेने ठरविले आहे. ही कर्मचारी कपात सुमारे १५ टक्के आहे, असे नोएल क्वीन यांनी नमूद केले. यातील बहुसंख्य कर्मचारी युरोपमधील असतील, असे दिसत आहे. बँकेचा युरोपमधील व्यवसाय बराच कमी झाला आहे. बँकेचे मुख्यालय लंडनमध्ये असून, तिथे सुमारे ४0 हजार कर्मचारी काम करतात. त्यातील अनेक जणांच्या नोकºया जाण्याची शक्यता आहे.या बँकेचा वार्षिक नफा ३३ टक्क्यांनी घसरून १३.३ अब्ज डॉलरवर आला आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पुढील तीन वर्षांमध्ये टप्प्याटप्प्याने कर्मचाºयांना कामावरून कमी करण्यात येणार आहे, असे क्वीन म्हणाले. मात्र भारतातील कर्मचाºयांना कमी केले जाणार का, हे स्पष्ट झालेले नाही. कोरोनाचाही परिणाम अपेक्षितआशिया खंडात, विशेषत: चीनमध्ये कोरोना विषाणूची मोठ्या प्रमाणात लागण झाली असून, त्याचाही परिणाम बँकेच्या व्यवसायावर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसे झाल्यास पुढील वर्षाच्या नफ्यात आणखी घट होईल. तसे झाल्यास कमी करण्यात येणाºया कर्मचाºयांची संख्या वाढू शकते.

टॅग्स :बँकिंग क्षेत्रअर्थव्यवस्था