नवी दिल्ली : फोरजी नेटवर्कवर चालणारा कमी किमतीचा मोबाइल हुवेई कंपनीने लाँच केला.
आॅनर बी२ हा नवीन फोन भारतात केवळ साडेसात हजारांत उपलब्ध करून देण्यात आला आहे. ११.४३ सेंमी. डिस्प्ले असणाऱ्या या स्मार्टफोनला २१०० एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.
तसेच उत्तम कॅमेराही देण्यात आला आहे. अॅण्ड्रॉइड (लॉलीपॉप) या आॅपरेटिंग सिस्टीमवर चालणाया या आॅनर बी२मध्ये १ जीबी रॅम आणि ८ जीबी मेमरी दिलेली आहे. शिवाय यात ३२ जीबीपर्यंत वाढ करण्याची सुविधाही आहे. कॅमेऱ्याला दोन्ही बाजूने फ्लॅश देण्यात आल्याचे कंपनीचे उपाध्यक्ष पी. संजीव यांनी सांगितले. (वाणिज्य प्रतिनिधी)
हुवेईने लाँच केला आॅनर बी२ फोन
फोरजी नेटवर्कवर चालणारा कमी किमतीचा मोबाइल हुवेई कंपनीने लाँच केला. आॅनर बी२
By admin | Published: April 25, 2017 12:31 AM2017-04-25T00:31:27+5:302017-04-25T00:31:27+5:30