Join us  

Human Hair Business : देश-परदेशातून मोठी मागणी; तुम्हाला माहितीय का, तुमच्या केसांची किंमत?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2024 10:26 AM

देशात केसांचा व्यापार फार लोकप्रिय आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून भारतात केसांचा बाजार सुरु आहे. देशातील केस कोट्यवधी रुपयांना विदेशात विकले जात असतात.

देशात केसांचा व्यापार फार लोकप्रिय आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून भारतात केसांचा बाजार सुरु आहे. देशातील केस कोट्यवधी रुपयांना विदेशात विकले जात असतात. दरवर्षी तब्बल ४ लाख डॉलर्सचे केस इतर देशांमध्ये पाठवले जातात. चांगल्या दर्जामुळे भारतीय केसांना चीन, मलेशिया, थायलंड, बांग्लादेश, श्रीलंका, ब्रह्मदेश या देशांमध्ये मोठी मागणी असते. दिवसेंदिवस ही मागणी वाढत आहे. २० ते २५ हजार रुपये प्रतिकिलोचा दर केसांना मिळतो. २०२० मध्ये विदेशात पाठवल्या जाणाऱ्या केसांचे प्रमाण ३९ टक्क्यांनी वाढले आहे.

कशी ठरते किंमत, कुठे होतो वापर?

  1. दर्जावरून केसांची किमत निश्चित केली जाते. काही केस ८ ते १० हजार रुपये प्रतिकिलोने विकत घेतले जातात तर चांगल्या दर्जाच्या केसांना २० ते २५ हजारांचा दर मिळू शकतो. केस तुटलेले नसावेत तसेच त्यांची लांबी ८ इंचांपेक्षा अधिक हवी, हा नियम आहे. 
  2. या केसांचा वापर ट्रान्सप्लांट करण्यासाठी विग तयार करणे या कामांसाठी केला जातो. सुरुवातीला केसांना केमिकलने साफ केले जाते. नंतर दर्जानुसार वेगळे केले जाते. 
  3. कोलकाता, चेन्नई, आंध्र प्रदेशातील व्यापारी घाऊक दरात याची खरेदी करतात. घराघरात फिरून केस गोळा केले जात असतात. कोलकात्यातली ९० टक्के केस चीनमध्ये पाठवले जातात. 

महिलांचे केस अधिक लोकप्रिय का?

  • गुजरातच्या केसांना बाजारात सर्वाधिक मागणी आहे. कारण हे केस मजबूत आणि चमकदार असतात.
  • महिलांचे केस लोकप्रिय असतात कारण ते लांब असतात. पोत चांगला असल्याने भारतीयांच्या केसांना किंमतही चांगली मिळते. 

कोणत्या केसांना सर्वाधिक मागणी?

  • बाजारात व्हर्जिन केसांना सर्वाधिक मागणी असते. व्हर्जिन म्हणजे असे ज्यांच्यावर कोणत्याही प्रकारची प्रक्रिया करण्यात आलेली नाही. भारतातील मंदिरांमध्ये मोठ्या प्रमाणावर केसांचे दान केले जाते. हे केसही नंतर विकले जातात. 
  • यात व्हर्जिन केसांचे प्रमाण सर्वाधिक असते. २०१४ मध्ये तिरुपती मंदिरातून २२० कोटींच्या केसांची विक्री करण्यात आली. २०१५ मध्ये या देवस्थानला केसाच्या इ-लिलावातून ७४ कोटींचे उत्पन्न मिळाले होते.
टॅग्स :व्यवसायभारतचीन