Lokmat Money > बिझनेस न्यूज > फ्लिपकार्ट-अ‍ॅमेझॉन विरोधात व्यापारी संघटना आक्रमक; श्वेतपत्रिका काढत व्यक्त केली मोठी भिती

फ्लिपकार्ट-अ‍ॅमेझॉन विरोधात व्यापारी संघटना आक्रमक; श्वेतपत्रिका काढत व्यक्त केली मोठी भिती

Amazon Flipkart : फ्लिपकार्ट आणि अ‍ॅमेझॉन सारख्या ई कॉमर्स कंपन्या बंद होण्याची शक्यता आहे. कारण, देशातील २ मोठ्या व्यापारी संघटनांनी या कंपन्यांविरोधात आवाज उठवला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2024 03:01 PM2024-10-02T15:01:59+5:302024-10-02T15:02:51+5:30

Amazon Flipkart : फ्लिपकार्ट आणि अ‍ॅमेझॉन सारख्या ई कॉमर्स कंपन्या बंद होण्याची शक्यता आहे. कारण, देशातील २ मोठ्या व्यापारी संघटनांनी या कंपन्यांविरोधात आवाज उठवला आहे.

huge discounts on e commerce platform amazon flipkart creating risk of grey market says cait | फ्लिपकार्ट-अ‍ॅमेझॉन विरोधात व्यापारी संघटना आक्रमक; श्वेतपत्रिका काढत व्यक्त केली मोठी भिती

फ्लिपकार्ट-अ‍ॅमेझॉन विरोधात व्यापारी संघटना आक्रमक; श्वेतपत्रिका काढत व्यक्त केली मोठी भिती

Amazon Flipkart : सध्या फ्लिपकार्ट आणि अ‍ॅमेझॉन या ई कॉमर्स साईटस्वर फेस्टीव सिझन सुरू आहे. आकर्षक जाहिरात आणि बंपर ऑफर्समुळे ग्राहकही खरेदीचा आनंद लुटत आहेत. सणासुदीच्या काळात अनेक ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्मवर मोठ्या सवलती मिळतात. याचा ग्राहकांना फायदा होत असला तरी सरकारचे मोठं नुकसान होत आहे. या प्लॅटफॉर्ममुळे ग्रे मार्केट निर्माण होण्याची भीती आहे. तुम्हीही ऑनलाईन शॉपिंग करत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. देशातील व्यापारी संघटना आता या ई-कॉमर्स कंपन्या विरोधात एकवटल्या आहेत.

देशातील व्यापाऱ्यांची संघटना 'कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स' (CAIT) आणि असोसिएशन ऑफ रिटेल मोबाइल सेलर्स यांनी या विरोधात आवाज उठवला आहे. ई-कॉमर्स कंपन्या अवास्तव किंमती ठरवतायेत. उत्पादनांवर मोठ्या प्रमाणात सूट देण्याचा ट्रेंड वाढतोय. परिणामी मोबाईल फोनचे अनधिकृत मार्केट किंवा ग्रे मार्केट तयार होण्याची भिती आहे. यामुळे सरकारी तिजोरीचे नुकसान होत असल्याचा आरोप या व्यापारी संघटनांनी केला आहे.

व्यापारी संघटनांकडून ‘श्वेतपत्रिका’
ऑल इंडिया मोबाईल रिटेलर्स असोसिएशन (AIMRA) च्या सहकार्याने CAIT ने भारताच्या रिटेल इकोसिस्टमवर ई-कॉमर्स कंपनी Amazon आणि Flipkart च्या प्रभावावर एक श्वेतपत्रिका जारी केली आहे. IMRA ने ई-कॉमर्स कंपन्यांशी संगनमत केल्याच्या आरोपाखाली चिनी मोबाईल फोन उत्पादक OnePlus, IQOO आणि Poco यांचे ऑपरेशन निलंबित करण्याची मागणी केली आहे.

फ्लिपकार्ट आणि अ‍ॅमेझॉनने थेट विदेशी गुंतवणूक (FDI) धोरण आणि इतर नियामक फ्रेमवर्कचे उल्लंघन केल्याचा आरोप या श्वेतपत्रिकेत करण्यात आला आहे. भाजप खासदार आणि कॅटचे ​​सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल म्हणाले, “ते (फ्लिपकार्ट आणि अ‍ॅमेझॉन) अवास्तव किंमत, भरघोस सूट, तोट्यातील वित्तपुरवठा अशा प्रकरणात खोलवर गुंतलेले आहेत. या कंपन्या गुंतवणुकीद्वारे व्यवहारातील रोख रक्कम कमी करत असून भारतातील त्यांच्या कामकाजातील नुकसान भरून काढण्यासाठी वापरत आहेत."

या आरोपांवर वनप्लस कंपनी प्रशासनाने प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. तर फ्लिपकार्ट, अ‍ॅमेझॉन, पोको आणि आयक्यूओ यांनी तत्काळ कोणताही प्रतिसाद दिला नाही. काही ब्रँड आणि बँका मोठ्या सवलती देण्यासाठी ई-कॉमर्स कंपन्यांशी संगनमत करत असल्याचा आरोप एआयएमआरएचे संस्थापक आणि अध्यक्ष कैलाश लख्यानी यांनी केला आहे. फ्लिपकार्ट आणि अ‍ॅमेझॉनसारख्या कंपन्यांविरोधात किरकोळ विक्रेते दीर्घ काळापासून लढत आहेत.

Web Title: huge discounts on e commerce platform amazon flipkart creating risk of grey market says cait

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.