Lokmat Money > बिझनेस न्यूज > PPF चं तुफान रिटर्न, ५००० गुंतवल्यास किती मिळणार पैसे? ३ गोष्टी लक्षात ठेवा, व्हाल मालामाल

PPF चं तुफान रिटर्न, ५००० गुंतवल्यास किती मिळणार पैसे? ३ गोष्टी लक्षात ठेवा, व्हाल मालामाल

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) योजना ही गुंतवणूकीच्या सर्वोत्तम पर्यायांपैकी एक मानली जाते. यात गुंतवणूक करुन तुम्ही काही वर्षांमध्ये लक्षाधीश होऊ शकता.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2024 11:53 AM2024-03-29T11:53:08+5:302024-03-29T11:53:49+5:30

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) योजना ही गुंतवणूकीच्या सर्वोत्तम पर्यायांपैकी एक मानली जाते. यात गुंतवणूक करुन तुम्ही काही वर्षांमध्ये लक्षाधीश होऊ शकता.

huge return in ppf how much money will you get if you invest 5000 3 rules keep in mind you will become millionaire | PPF चं तुफान रिटर्न, ५००० गुंतवल्यास किती मिळणार पैसे? ३ गोष्टी लक्षात ठेवा, व्हाल मालामाल

PPF चं तुफान रिटर्न, ५००० गुंतवल्यास किती मिळणार पैसे? ३ गोष्टी लक्षात ठेवा, व्हाल मालामाल

PPF Calculator: सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) योजना ही गुंतवणूकीच्या सर्वोत्तम पर्यायांपैकी एक मानली जाते. भारतातील कोणताही नागरिक यामध्ये गुंतवणूक करू शकतो. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे यात मिळणारे फायदे हे सर्वांच्याच पसंतीचे राहतात. बँका आणि पोस्ट ऑफिस स्वतः पीपीएफमध्ये गुंतवणुकीचे फायदे समजावून सांगतात. उत्तम व्याज (PPF Interest), टॅक्स फ्री इनव्हेस्टमेंट (Tax free investment), मॅच्युरिटीवर मिळणारे पैसे (PPF Maturity) पूर्णपणे तुमचे.
 

गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून हे एक उत्तम साधन मानलं जातं. याचा मॅच्युरिटी कालावधी 15 वर्षे आहे. परंतु, 15 वर्षांनंतरही गुंतवणूक वाढवता येते. तुम्ही मुदतवाढ दिल्यास, तुम्हाला मोठा परतावा मिळू शकतो आणि 5000 रुपयांची गुंतवणूक 26 लाखांपेक्षा अधिक होईल.
 

'या' तीन गोष्टी लक्षात ठेवा
 

मॅच्युरिटीच्या वेळी तुम्हाला 3 पर्याय मिळतात. हे तीन पर्याय समजून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. पहिला पर्याय मॅच्युरिटीनंतर पैसा काढून घेणं. दुसरा म्हणजे पैसे काढले नाही तरी त्यावर व्याज मिळत राहील आणि तिसरा पर्याय म्हणजे तुम्ही यासाठी 5 वर्षांसाठी एक्स्टेन्शन घेऊ शकता.
 

मॅच्युरिटीवर पूर्ण पैसे काढणं
 

पीपीएफ खात्याच्या मॅच्युरिटीवर, तुम्ही जमा केलेली रक्कम आणि व्याज काढा. अकाऊंट क्लोजरच्या स्थितीत, संपूर्ण पैसे तुमच्या खात्यात हस्तांतरित केले जातील. मॅच्युरिटीवर मिळणारे पैसे आणि व्याज पूर्णपणे करमुक्त असेल. याशिवाय दरवर्षी 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर आयकर सूट मिळते. संपूर्ण कार्यकाळात तुम्ही जमा केलेल्या पैशांवर तुम्हाला कोणताही कर भरावा लागणार नाही.
 

5 वर्षांसाठी गुंतवणूक वाढवा
 

दुसरा पर्याय म्हणजे मॅच्युरिटीनंतर गुंतवणूक वाढवणं. योजनेत ५-५ वर्षांच्या कालावधीसाठी तुम्हाला अकाऊंट एक्स्टेन्शचा पर्याय मिळतो. जर तुम्हाला 5 वर्षांसाठी मुदतवाढ हवी असेल, तर तुम्हाला PPF खात्याच्या मॅच्युरिटीपूर्वी 1 वर्ष आधी बँक किंवा पोस्ट ऑफिसला यासंदर्भातील माहिती द्यावी लागेल. चांगली गोष्ट अशी आहे की मुदतवाढीच्या वेळी प्री-मॅच्युअर विड्रॉलचा नियम लागू होत नाही आणि तुम्ही कधीही पैसे काढू शकता.
 

मॅच्युरिटीनंतर विना गुंतवणूक स्कीम वाढवा
 

पीपीएफ खात्यातील तिसरा पर्याय, तुम्ही वरील दोन पर्याय निवडले नसले तरीही, खातं मॅच्युरिटीनंतरही कार्यरत राहील. यामध्ये नव्या गुंतवणुकीची गरज भासणार नाही. मॅच्युरिटी आपोआप 5 वर्षांनी वाढेल. परंतु, सर्वात मोठा फायदा असा होईल की या संपूर्ण कालावधीत तुम्हाला जमा केलेल्या रकमेवर व्याज मिळत राहील. यानंतर 5 वर्षे पूर्ण झाल्यानंतर पुन्हा त्याच पद्धतीनं मुदतवाढ दिली जाऊ शकते
 

₹5000 मधून कसे होतील 26.63 लाख
 

Public Provident Fund मध्ये सध्या 7.1 टक्के व्याज मिळत आहे. वार्षिक आधारावर व्याजाची गणना केली जाते. परंतु हे तिमाही आधारावर निश्चित केलं जातं. गेल्या बऱ्याच काळापासून याच्या व्याजदरात कोणताही बदल झालेला नाही. जर तुम्ही 15 किंवा 20 वर्षांसाठी याच व्याजदरावर गुंतवणूक केली तर निरनिराळ्या रकमेवर मोठा फंड तयार होईल.
 

जर तुम्ही महिन्याला 5 हजार रुपये याप्रमाणे वर्षाला 60 हजार रुपयांची गुंतवणूक केली तर, 7.1 टक्के व्याजदरानुसार 20 वर्षात तुम्ही 1200000 रुपयांची गुंतवणूक करता. यावर व्याजापोटी तुम्हाला 1463315 रुपये मिळतील. मॅच्युरिटीवर मिळणारी एकूण रक्कम 2663315 रुपये असेल.

Web Title: huge return in ppf how much money will you get if you invest 5000 3 rules keep in mind you will become millionaire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.