Lokmat Money > बिझनेस न्यूज > सर्वसामान्यांना मोठा दिलासा! सणासुदीला साबणाच्या किमती घसरल्या; जाणून घ्या, नवे दर

सर्वसामान्यांना मोठा दिलासा! सणासुदीला साबणाच्या किमती घसरल्या; जाणून घ्या, नवे दर

साबण कंपन्यांकडून साबणाच्या किमती कमी करण्यात आल्या आहेत. रोजच्या वापरातील वस्तू तयार करणाऱ्या FMCG कंपनीने साबणाऱ्या किमती 15 टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2022 12:02 PM2022-10-10T12:02:11+5:302022-10-10T12:11:44+5:30

साबण कंपन्यांकडून साबणाच्या किमती कमी करण्यात आल्या आहेत. रोजच्या वापरातील वस्तू तयार करणाऱ्या FMCG कंपनीने साबणाऱ्या किमती 15 टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

hul gcpl cut soap prices by upto 15 percent as raw material rates soften | सर्वसामान्यांना मोठा दिलासा! सणासुदीला साबणाच्या किमती घसरल्या; जाणून घ्या, नवे दर

सर्वसामान्यांना मोठा दिलासा! सणासुदीला साबणाच्या किमती घसरल्या; जाणून घ्या, नवे दर

महागाईने सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलं आहे. पण आता सर्वसामान्यांसाठी एक खूशखबर असून त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सणासुदीच्या काळात साबण कंपन्यांनी आता ग्राहकांना दिलासा दिला आहे. साबण कंपन्यांकडून साबणाच्या किमती कमी करण्यात आल्या आहेत. रोजच्या वापरातील वस्तू तयार करणाऱ्या FMCG कंपनीने साबणाऱ्या किमती 15 टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. कच्च्या उत्पादनाच्या किंमती घसरल्याने हा निर्णय घेतल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं. 

हिंदुस्तान युनिलीवर लिमिटेड, गोदरेज यांनी साबणाऱ्या किमती कमी केल्याची माहिती मिळाली आहे. लाइफबॉय आणि लक्स ब्रँडने साबणाच्या किमतीमध्ये 5 ते 11 टक्क्यांपर्यंत कमी केल्या आहेत. गोदरेजने 13 ते 15 टक्के किमती कमी केल्या आहेत. गोदरेज नंबर वन साबणाच्या पाच पाकिटांची किंमत 140 रुपये होती. हा साबण आता 120 रुपयांना ग्राहकांना मिळणार आहे. सणासुदीला घरात तुम्ही साबण खरेदी करणार असाल तर तुमच्या खिशावरचा भार कमी होणार आहे. 

कपड्यांचे साबण आणि पावडर यामध्ये सध्या कोणताही बदल झाल्याची माहिती अजून समोर आली नाही. फक्त अंघोळीच्या साबणाच्या किमतीवर हे बदल करण्यात आले आहेत. सर्फ, रिन, व्हील आणि डोवसारख्या अन्य ब्रँडच्या किमती कमी झालेल्या नाहीत. अबनीश रॉय यांनी दिलेल्यानुसार गेल्या एका वर्षात किमती वाढल्यामुळे एचयूएलच्या विक्रीवर परिणाम झाला होता पण उलटा प्रकार घडत असल्याचं दिसत आहे. त्यामुळे विक्री वाढण्याची अपेक्षा आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: hul gcpl cut soap prices by upto 15 percent as raw material rates soften

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.