मुंबई : मधुमेहाच्या रुग्णांसाठी उपयुक्त असलेल्या ‘अमृत नोनी डी प्लस’ची मानवी चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण झाली आहे. ‘व्हॅल्यू प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड’चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ए. के. श्रीनिवासमूर्ती यांनी ही माहिती दिली.
डाॅ. श्रीनिवासमूर्ती यांनी सांगितले की, ‘अमृत नोनी डी-प्लस’च्या नियमांनुसार नैदानिक चाचण्या झाल्या आहेत. मानवी वापरासाठी ते बाजारातही आले आहे. त्याचे दुष्परिणाम नाहीत, असे दिसून आले आहे. चाचणी घेणारे तज्ज्ञ श्रीयुजीन विनफ्रेड यांनी सांगितले की, ३० ते ६५ वर्षे वयोगटातील स्त्रिया आणि प्रकार-२ मधुमेह असलेल्या पुरुषांवर क्लिनिकल चाचणी घेण्यात आली. अहवालानुसार, अमृत नोनी डी प्लसने त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात आणली. त्यांच्यामध्ये एचबीएआयसी, एफबीएस, पीपीबीएस, लिपिड प्रोफाईल लक्षणीय प्रमाणात कमी झाल्याचे आढळून आले. (वा. प्र.)