ओरॅकल या दिग्गज सॉफ्टवेअर कंपनीतील कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा मोठा झटका लागला आहे. ओरॅकलनं आपल्या हेल्थ युनिटमधून शेकडो कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचा निर्णय घेतलाय. याशिवाय कंपनीनं जॉब ऑफर्सही रद्द केल्या आहेत आणि ओपन पोझिशन्स कमी केल्या आहेत. वृत्तसंस्था रॉयटर्सने सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. ओरॅकलच्या हेल्थ युनिट म्हणजेच Cerner या इलेक्ट्रॉनिक मेडिकल रेकॉर्ड कंपनीनं गेल्या महिन्यातच कर्मचारी कपात केली होती.
ओरॅकलच्या हेल्थ युनिटमध्ये इलेक्ट्रॉनिक मेडिकल रेकॉर्ड फर्म Cerner चा समावेश करण्यात आलाय. ही कंपनी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये 28.3 अब्ज डॉलर्समध्ये खरेदी करण्यात आली होती. ही कर्मचारी कपात यूएस डिपार्टमेंट ऑफ वेटरन्स अफेअर्समधील आव्हानांमुळे झाली. याची नियुक्ती नव्या तंत्रज्ञानासह होममेड मेडिकल रेकॉर्डला नव्या तंत्रज्ञानानं बदलण्यासाठी करण्यात आली होती. कामावरून कमी करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना प्रत्येक वर्षाच्या हिशोबानं एका महिन्याप्रमाणे वेतन, अतिरिक्त आठवडा आणि सुट्ट्यांच्या दिवसाचं वेतन कंपनी देणार आहे.
गेल्या महिन्यातही मोठी कपात
ओरॅकलने गेल्या महिन्यात मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केलं होतं. याचा फटका तीन हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना बसला. एका माजी कर्मचाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मार्केटिंग, इंजिनिअरिंग, अकाऊंटिंग, लीगल आणि प्रोडक्ट टिमवर याचा परिणाम झाला. त्याचवेळी कर्मचाऱ्यांची पदोन्नतीही थांबल्यानं पगारवाढ झाली नाही. या छाटणीपूर्वी या ठिकाणी सुमारे २८ हजार कर्मचारी कार्यरत होते.