नवी दिल्ली/मुंबई : गेल्या काही दिवसांपासून शंभरीकडे वाटचाल करत असलेल्या पेट्रोलने अखेरीस शतकाची नोंद केली आहे. सरकारी तेल कंपन्यांनी रविवारी सलग सहाव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत अनुक्रमे २९ आणि ३२ पैशांची वाढ केल्याने देशात अनेक ठिकाणी प्रिमियम पेट्रोलचे दर लिटरमागे १०० रुपयांहून अधिक झाले. काही पेट्राेल पंपांवर जुन्या मशीनमध्ये तीन अंकी किंमत दर्शविण्याची सुविधा नसल्याने पंपचालकांना चक्क पेट्राेलची विक्री थांबवावी लागली. साध्या पेट्रोलचे दरही झपाट्याने शतकाकडे वाटचाल करत आहेत. नांदेडमध्ये ९९.९९ रुपये तर परभणीत ९७.३४ रुपये दराने पेट्रोल विक्री होत होती. महाराष्ट्रासह मध्य प्रदेश आणि राजस्थान या राज्यांमध्ये काही ठिकाणी प्रिमियम पेट्राेलने शंभरी गाठली आहे.
परभणीत वाहनधारकांना एका लिटरमागे ९८ रुपये मोजावे लागले, तर प्रिमियम पेट्रोलचे दर मात्र १००.७६ रुपयांपर्यंत पोहोचले. त्यामुळे लिटरमागे १०१ रुपये वाहनधारकांना मोजावे लागत होते. हिंगाेलीतही प्रिमियम पेट्राेल ९९.७७ रुपये झाले आहेत. दिल्लीत पेट्राेलचा दर ८८.७३ तर डिझेलचा (पान १० वर)
राजस्थान व मध्य प्रदेशातही भडका
-देशात राजस्थानातील गंगानगर येथे साधे पेट्राेल शंभरीच्या उंबरठ्यावर आहे. तेथे ९९.२९ पैसे प्रतिलिटर दराने पेट्राेल विक्री झाली. तर प्रिमियम पेट्राेल १०२ रुपये प्रतिलिटर दराने विकण्यात आले.
- डिझेलचे दरही ९१.१७ रुपये प्रतिलिटरपर्यंत पाेहाेचले. राजस्थानात पेट्राेल आणि डिझेलवरील व्हॅट २ रुपयांनी कमी केला तरीही तेथे ३६ टक्के व्हॅट व १५०० रुपये प्रति किलाेलिटर रस्ते अधिभार आकारण्यात येताे.
पेट्राेलचे दर (रु. प्रति लीटर)
शहर प्रीमियम साधे
परभणी १००.७६ ९७.३४
दिल्ली ९१.५६ ८८.७३
मुंबई ९८.१३ ९५.१६
नागपूर ९९.१५ ९५.६९
औरंगाबाद ९९.८१ ९६.३५
हिंगाेली ९९.७७ ९६.०९
नांदेड ९९.९९ ९७.२१
जळगाव ९९.१० ९६.२५
अमरावती ९९.३७ ९६.५७
बुलडाणा ९९.४२ ९६.६५
यवतमाळ ९९.२३ ९६.५९
भंडारा ९९.०० ९५.५६
भाेपाळ १००.०४ ९६.६७
गंगानगर १०२.०७ ९९.२२