Lokmat Money > बिझनेस न्यूज > Post Office: विवाहित लोकांची बल्ले-बल्ले, पोस्ट ऑफिस थेट खात्यात ट्रान्सफर करणार 59400 रुपये!

Post Office: विवाहित लोकांची बल्ले-बल्ले, पोस्ट ऑफिस थेट खात्यात ट्रान्सफर करणार 59400 रुपये!

या योजनेत पती-पत्नी दोघांचीही कमाई होईल. तुम्हाला माहीतच असेल, की आजच्या काळात पोस्ट ऑफिस हा गुंतवणुकीसाठीचा एक सर्वोत्तम पर्याय मानला जात आहे. कारण यात पैशांच्या सुरक्षिततेसोबतच हमखास परतावाही मिळतो.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2022 09:48 AM2022-12-07T09:48:54+5:302022-12-07T09:49:51+5:30

या योजनेत पती-पत्नी दोघांचीही कमाई होईल. तुम्हाला माहीतच असेल, की आजच्या काळात पोस्ट ऑफिस हा गुंतवणुकीसाठीचा एक सर्वोत्तम पर्याय मानला जात आहे. कारण यात पैशांच्या सुरक्षिततेसोबतच हमखास परतावाही मिळतो.

husband and wife will get 59400 rupees by post office scheme know about details | Post Office: विवाहित लोकांची बल्ले-बल्ले, पोस्ट ऑफिस थेट खात्यात ट्रान्सफर करणार 59400 रुपये!

Post Office: विवाहित लोकांची बल्ले-बल्ले, पोस्ट ऑफिस थेट खात्यात ट्रान्सफर करणार 59400 रुपये!

जर तुमचेही लग्न झाले असेल आणि तुम्ही दर महिन्याला उत्पन्नाचा एका सुरक्षित पर्याय शोधत असाल, तर आज आम्ही तुम्हाला अशाच एका सरकारी योजनेसंदर्भात माहिती देणार आहोत. या योजनेत पती-पत्नी दोघांचीही कमाई होईल. तुम्हाला माहीतच असेल, की आजच्या काळात पोस्ट ऑफिस हा गुंतवणुकीसाठीचा एक सर्वोत्तम पर्याय मानला जात आहे. कारण यात पैशांच्या सुरक्षिततेसोबतच हमखास परतावाही मिळतो.

काय आहे स्कीमचे नाव? -
पोस्ट ऑफिसच्या या योजनेचे नाव आहे 'पोस्ट ऑफीस मंथली सेविंग्स स्कीम' (Post Office Monthly Savings Scheme). या योजनेत दर महिन्याला तुमची कमाई होईल. या योजनेत आपण सिंगल अकाउंट देखील ओपन करू शकता. तसेच तुमचे लग्न झाले असेल, तर तुम्ही या योजनेत जॉइंट अकाउंट देखील ओपन करू शकता.

खात्यात जमा होतील 59400 रुपये -
या योजनेत विवाहित लोक जॉइंट अकाउंट ओपन करू शकतात. अशा स्थितीत या योजनेत तुम्हाला 9 लाख रुपये जमा करावे लागतील. यावर आपल्याला 6.6 टक्के दराने व्याज मिळेल. जर वर्षि उत्पन्ना संदर्भात बोलायचे झाल्यास, यात तुम्हाला जवळपास 59400 रुपयांचा फायदा होत जाईल. तसेच, दर महिन्याला आपल्या खात्यात 4950 रुपये जमा होतील.

असं आहे कॅलक्युलेशन? -
या स्कीम अंतर्गत आपण जमा केलेल्या एकूण पैशांवर वार्षिक व्याजाचा फायदा मिळवता. यात आपल्या एकूण परताव्याचे कॅल्क्युलेशन वार्षिक आधारावर केले जाते. याची तुम्ही 12 टप्प्यांत विभागणी करू शकता. याचा एक भाग तुम्ही दर महिन्याला तुमच्या अकाउंटमध्ये घेऊ शकता. तसेच, तुम्हाला आवश्यकता नसेल, तर तुम्ही हा संपूर्ण पैसा मॅच्योरिटीवरही घेऊ शकता.

Web Title: husband and wife will get 59400 rupees by post office scheme know about details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.