लाेकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : वाढत्या महागाईच्या चिंतेने त्रस्त असलेल्या सर्वसामान्यांना आरबीआयने दिलासा दिला आहे. रेपाे रेटमध्ये यावेळीदेखील काेणतीही वाढ न करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे गृहकर्जदारांच्या खिशावर अतिरिक्त ताण पडणार नसून ईएमआय सध्या तरी आहे तेवढाच राहणार आहे. मात्र, त्याचवेळी आरबीआयने महागाईचा अंदाजित दर वाढविला आहे. म्हणजेच, येणाऱ्या काळात महागाई वाढू शकते. आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी द्विमासिक आढावा बैठकीनंतर माहिती दिली
असा वाढला व्याजदर मे २०२० ४.४० जून २०२० ४.९० ऑगस्ट २०२० ५.४० सप्टेंबर २०२० ५.९० डिसेंबर २०२० ६.२५ फेब्रुवारी २०२३ ६.५०
५.४% सरासरी किरकाेळ महागाईचा अंदाज चालू आर्थिक वर्षात केला आहे.४.३ % किरकाेळ महागाईचा दर मे महिन्यात हाेता.४.८% हा दर झाला जून महिन्यात.
६.५ % जीडीपी वाढीचा दर कायम आहे.६.६ % दराने जीडीपीमध्ये वाढ पुढील आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत राहू शकते.
चॅटवरच आदेश द्या, एआय करेल पेमेंटnआरबीआयने युपीआय पेमेंटसाठी ‘एआय’ वापरण्याची घाेषणा केली आहे. यासाठी ‘एआय’च्या माध्यमातून चॅट किंवा मेसेजिंगदरम्यान पेमेंटची प्रक्रिया पूर्ण हाेईल. nयाला कन्वहर्सेशनल पेमेंट म्हटले आहे. चॅटवरून आदेश द्या आणि दुसऱ्याच क्षणी एआयद्वारे पेमेंट पूर्ण हाेईलnयाशिवाय युपीआय लाईटच्या माध्यमातून हाेणाऱ्या पेमेंटसाठी २०० रुपयांची मर्यादा वाढवून ५०० रुपये केली आहे.
काय म्हणाले आरबीआय गव्हर्नर?nमहागाई अजूनही ४ टक्क्यांच्या वर आहे. ताे ४ टक्क्यांच्या खाली आणण्यासाठी आरबीआयचे प्रयत्न राहतील. nयेणाऱ्या काळात देशाला आर्थिक विकासाबाबत बाह्य आव्हानांचा सामना करावा लागू शकताे.nजागतिक अर्थव्यवस्था हवामान बदल, महागाई आणि राजकीय अस्थिरतेचा सामना करीत आहे. याचा भारतावर परिणाम हाेण्याची शक्यता आहे.