Lokmat Money > बिझनेस न्यूज > Hyundai India IPO : सर्व जुने रेकॉर्ड मोडणार; 'ही' ऑटोमोबाईल कंपनी आणणार आतापर्यंतचा सर्वात मोठा IPO

Hyundai India IPO : सर्व जुने रेकॉर्ड मोडणार; 'ही' ऑटोमोबाईल कंपनी आणणार आतापर्यंतचा सर्वात मोठा IPO

Hyundai India IPO : हा IPO एलआयसीच्या 21,000 कोटी रुपयांपेक्षाही मोठा असेल.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2024 07:45 PM2024-09-25T19:45:59+5:302024-09-25T19:46:12+5:30

Hyundai India IPO : हा IPO एलआयसीच्या 21,000 कोटी रुपयांपेक्षाही मोठा असेल.

Hyundai India IPO : automobile company will bring the country's largest IPO | Hyundai India IPO : सर्व जुने रेकॉर्ड मोडणार; 'ही' ऑटोमोबाईल कंपनी आणणार आतापर्यंतचा सर्वात मोठा IPO

Hyundai India IPO : सर्व जुने रेकॉर्ड मोडणार; 'ही' ऑटोमोबाईल कंपनी आणणार आतापर्यंतचा सर्वात मोठा IPO

Hyundai India IPO : भारतीय शेअर बाजाराला येत्या काळात नवीन वळण मिळू शकते. याचे कारण म्हणजे ऑटोमोबाईल कंपनी ह्युंदाई मोटर इंडिया लवकरच आपला IPO आणत आहे. हा IPO भारतीय शेअर बाजाराचे सर्व रेकॉर्ड मोडेल. एलआयसी, रिलायन्स पॉवर आणि पेटीएमच्या तुलनेत हा आयपीओ देशातील आतापर्यंतचा सर्वात मोठा आयपीओ असणार आहे. बाजार नियामक सेबीनेही कंपनीला IPO लॉन्च करण्यास ग्रीन सिग्नल दिला आहे.

Hyundai Motor India ही दक्षिण कोरियन ऑटो कंपनी Hyundai Motors ची उपकंपनी आहे. कंपनी 25 वर्षांहून अधिक काळापासून भारतात आपला व्यवसाय करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, Hyundai Motor India $3 अब्ज (सुमारे 25,000 कोटी रुपये) चा IPO घेऊन येणार आहे. त्यानुसार कंपनीचे मूल्यांकन 20 अब्ज डॉलर्स (सुमारे 1.67 लाख कोटी रुपये) होणार आहे.

सर्व जुने रेकॉर्ड मोडले जातील
या IPO मुळे देशातील आतापर्यंतचे IPO चे सर्व रेकॉर्ड मोडले जातील. हा देशातील सर्वात मोठा IPO असणार आहे. यापूर्वी, भारतीय आयुर्विमा महामंडळाचा IPO (LIC IPO) सुमारे 21,000 कोटी रुपये, Paytm चा IPO 18,300 कोटी रुपये, कोल इंडियाचा IPO 15,199 कोटी रुपये आणि रिलायन्स पॉवरचा IPO 11,563 कोटी रुपये होता. स्विगीचा आयपीओही बाजारात येणार आहे, ज्याची किंमत सुमारे 10,000 कोटी रुपये असेल.

OFS असेल Hyundai चा IPO 
Hyundai India ने जूनमध्ये IPO लॉन्च करण्यासाठी SEBI कडे कागदपत्रे सादर केली होती. या IPO मध्ये Hyundai India ची प्रवर्तक कंपनी Hyundai Motors त्याच्या काही स्टेकची विक्री करेल आणि सुमारे 14,21,94,700 शेअर्स ऑफर फॉर सेल (OFS) साठी ठेवले जातील. Hyundai Motor India भारतात प्रवासी कार ते SUV विभागातील 13 मॉडेल्स विकते. Hyundai ची सिस्टर कंपनी Kia Motors देखील भारतात मजबूत उपस्थिती आहे.

भारतात जवळपास 20 वर्षांनंतर एखाद्या ऑटोमोबाईल कंपनीचा शेअर बाजारात लिस्ट होणार आहे. यापूर्वी 2003 मध्ये देशातील सर्वात मोठी ऑटो मोबाईल कंपनी मारुती सुझुकी इंडियाने आपला IPO लॉन्च केला होता.
 

Web Title: Hyundai India IPO : automobile company will bring the country's largest IPO

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.