Lokmat Money > बिझनेस न्यूज > Hyundia India IPO : देशातील सर्वात मोठ्या IPO चा गुंतवणूकदारांना धक्का! दीड टक्के डिस्काउंटनंतरही शेअर्स धडाम

Hyundia India IPO : देशातील सर्वात मोठ्या IPO चा गुंतवणूकदारांना धक्का! दीड टक्के डिस्काउंटनंतरही शेअर्स धडाम

Hyundai IPO Listing: ह्युंदाई मोटर इंडियाचा IPO मंगळवारी शेअर बाजारात लिस्ट झाला. या IPO ने लिस्टिंगमध्ये चांगली कामगिरी केली नाही. ग्रे मार्केटमध्येही चांगला प्रतिसाद मिळाला नव्हता.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2024 10:41 AM2024-10-22T10:41:00+5:302024-10-22T10:44:29+5:30

Hyundai IPO Listing: ह्युंदाई मोटर इंडियाचा IPO मंगळवारी शेअर बाजारात लिस्ट झाला. या IPO ने लिस्टिंगमध्ये चांगली कामगिरी केली नाही. ग्रे मार्केटमध्येही चांगला प्रतिसाद मिळाला नव्हता.

hyundai motor ipo listing india biggest ipo listing surpassed lic shares debut at discount hyundai motor share price slips | Hyundia India IPO : देशातील सर्वात मोठ्या IPO चा गुंतवणूकदारांना धक्का! दीड टक्के डिस्काउंटनंतरही शेअर्स धडाम

Hyundia India IPO : देशातील सर्वात मोठ्या IPO चा गुंतवणूकदारांना धक्का! दीड टक्के डिस्काउंटनंतरही शेअर्स धडाम

Hyundai IPO Listing: देशातील सर्वात मोठा आयपीओ ह्युंदाई मोटर इंडिया आज (मंगळवारी) शेअर बाजारात सूचीबद्ध झाला. मात्र, लिस्टिंगनंतर गुंतवणूकदारांची मोठी निराशा झाली. हा आयपीओ बीएसईवर लिस्ट झाला असून इश्यू किमतीच्या तुलनेत तोटा झाला आहे. त्याची इश्यू किंमत १९६० रुपये होती. अशा स्थितीत त्याची BSE वर लिस्टिंग १.४८ टक्क्यांनी घसरून १९३१ रुपयांवर आली. हा IPO NSE वरही चांगली कामगिरी करू शकला नाही. तिथे १.३३ टक्क्यांच्या तोट्यासह १९३४ रुपयांवर सूचीबद्ध झाला.

या IPO चा इश्यू आकार २७,८७० कोटी होता. हा आयपीओ उघडल्यानंतर पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांनी याकडे पाठ फिरवली. ती केवळ १८ टक्के भरली गेली. मात्र, तिसऱ्या दिवशी त्यात काहीशी वाढ झाली. शेवटच्या दिवसापर्यंत ते २.३७ वेळा सब्स्क्राइब झाला. हा IPO जितका मोठा होता तितके सबस्क्रिप्शन मिळालं नाही.

ग्रे मार्केटमध्ये काय परिस्थिती?
या आयपीओला सुरुवातीपासून ग्रे मार्केटमध्ये चांगला भाव मिळाला नाही. त्याचा IPO उघडण्याच्या आदल्या दिवशी त्याचा GMP ४५ रुपयांपर्यंत खाली आला होता. ज्या दिवशी IPO उघडला, त्या दिवशी GMP ६३ रुपयांपर्यंत वाढला. मात्र, त्यानंतरही त्यात घसरण सुरूच राहिली. ज्या दिवशी आयपीओ बंद झाला, त्या दिवशी ग्रे मार्केटमध्ये तोट्यात होता. आज सूचीबद्ध होण्यापूर्वी, ग्रे मार्केटमध्ये त्याची जीएमपी ४८ रुपये होती. याचा अर्थ ते २.४५ टक्के प्रीमियमवर सूचीबद्ध होणे अपेक्षित होते.

२० वर्षात भारतातील ऑटोमेकर कंपनीचा पहिला IPO
हा IPO २० वर्षांतील भारतातील ऑटोमेकर कंपनीचा पहिला आयपीओ आहे. यापूर्वी मारुती सुझुकीचा IPO २००३ मध्ये आला होता. मारुती सुझुकी इंडियानंतर ह्युंदाई ही देशातील दुसरी सर्वात मोठी कार निर्माता कंपनी आहे.

IPO म्हणजे काय?
जेव्हा एखादी कंपनी प्रथमच आपले शेअर्स सर्वसामान्यांसाठी जारी करते तेव्हा त्याला इनिशियल पब्लिक ऑफरिंग म्हणजेच IPO म्हणतात. कंपनीला व्यवसाय वाढवण्यासाठी पैशांची गरज आहे. अशा स्थितीत बाजारातून कर्ज घेण्याऐवजी कंपनी काही शेअर्स लोकांना विकून किंवा नवीन शेअर्स देऊन पैसा उभा करते. यासाठी कंपनी IPO आणते.

Web Title: hyundai motor ipo listing india biggest ipo listing surpassed lic shares debut at discount hyundai motor share price slips

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.