Hyundai Motor India IPO : वाहन क्षेत्रातील दिग्गज कंपनी ह्युंदाई मोटर इंडियाचा आयपीओ मंगळवारी लिस्ट झाला आहे. ह्युंदाई मोटर इंडियाच्या शेअरचं (Hyundai Motor India Share Price) १,९३१ रुपयांवर म्हणजे इश्यू प्राईजपेक्षा १.५ टक्क्यांच्या डिस्काऊंटवर लिस्टिंग झालं. मुंबई शेअर बाजारात हा शेअर १,९३१ रुपये, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये १,९३४ रुपये प्रति शेअर दरानं लिस्ट झाला. वाहन क्षेत्रात तब्बल दोन दशकांनंतर आयपीओ आलाय. ह्युंदाई मोटर इंडियाच्या आयपीओची इश्यू प्राइस १,९३४ रुपये प्रति शेअर होती. ह्युंदाई इंडिया मोटरचा शेअर (Hyundai Motor India Share), शेअर बाजारात लिस्टिंग झाल्यानंतर लगेचच ३ टक्क्यांहून अधिक घसरला.
परंतु लिस्टिंगच्या दिवशी ह्युंदाई मोटरवर ब्रोकरेज बुलिश दिसत आहेत. नोमुराने कंपनीच्या शेअरवर खरेदीचा सल्ला दिला आहे. या शेअरवर त्यांनी २४७२ चं टार्गेट दिलंय. त्याचबरोबर मॅक्वेरीनं ह्युंदाईसाठी २२३५ च्या टार्गेटसह आउटपरफॉर्मन्स रेटिंगही दिलंय आहे.
मॅक्वेरीनं काय म्हटलं?
मॅक्वेरीनं ह्युंदाई इंडियावर आउटपरफॉर्म रेटिंगसह कव्हरेज सुरू केलं आहे. ब्रोकरेजनं या शेअरसाठी २२३५ रुपयांची टार्गेट प्राईज ठेवली आहे. HMIL प्रीमिअम PE मल्टिपलवर ट्रेड करण्यायोग्य दिसत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. मॅक्वेरीच्या मते, उत्तम पोर्टफोलिओ मिक्स, प्रीमियम पोझिशनिंगमुळे कंपनीला फायदा होऊ शकतो, असंही त्यांनी नमूद केलंय.
नोमूरानं काय म्हटलंय?
नोमुरानं ह्युंदाई इंडियावर ((Hyundai Motor India) बाय रेटिंगसह कव्हरेज सुरू केलंय. नोमुराने या स्टॉकसाठी २४७२ रुपयांची टार्गेट प्राईज ठेवली आहे. प्रिमियमायझेशनवर लक्ष केंद्रित केल्यास चांगली वाढ शक्य असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. नोमुराच्या म्हणण्यानुसार, भारतीय कार उद्योगात चांगली वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या १००० लोकांमागे फक्त ३६ कार्स आहेत.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. यातील तज्ज्ञांची मतं त्यांची वैयक्तिक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)