Join us

"वाटलं नव्हतं लोक इतका विरोध करतील..," Pure Veg वर काय म्हणाले Zomatoचे दीपिंदर गोयल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2024 11:06 AM

झोमॅटोचे सीईओ दीपिंदर गोयल यांनी अलीकडेच प्युअर व्हेज फ्लीटची सुरुवात केली होती. परंतु अवघ्या एकाच दिवसात ही सेवा बंद करण्यात आली.

झोमॅटोचे सीईओ (Zomato CEO) दीपिंदर गोयल (Deepinder Goyal) यांनी अलीकडेच प्युअर व्हेज (Pure Veg) फ्लीटची सुरुवात केली होती. परंतु लोकांच्या प्रतिक्रियांनंतर हा उपक्रम सुरू होण्यापूर्वीच बंद करण्यात आला. "५० वर्षांवरील व्यक्तींना केवळ व्हेजच पर्याय हवा असतो असं बाजारातील सर्वेक्षणातून दिसून आलं होतं. अशातच ते शुद्ध शाकाहारी रेस्तराँ (Pure Veg Restaurants) शोधत असतात. असं करण्यामागे या लोकांची काही अध्यात्मिक कारणं होती," असं दीपिंदर गोयल म्हणाले.  

झोमॅटो ग्रीनच्या लॉन्चला एवढा विरोध होईल, असं वाटलं नव्हतं, असं दीपिंदर गोयल म्हणाले. इकॉनॉमिक टाईम्सशी साधलेल्या विशेष संवादादरम्यान त्यांनी यावर भाष्य केलं. "आम्ही खूप मोठं सर्वेक्षण केलं होतं. यामध्ये ५० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या लोकांची मतं जाणून घेण्यात आली. आपण केवळ व्हेज रेस्तराँमधूनच ऑर्डर करू इच्छितो असं असं मोठ्या प्रमाणात लोकांनी सांगितलं. हा एक मोठा कस्टमर सेगमेंट होता आणि म्हणून हे लाँच करण्याचा निर्णय आम्ही घेतला. सर्वेक्षणात १६०० ग्राहकांची माहिती घेण्यात आली, ज्यामध्ये ७२ टक्के ग्राहकांनी व्हेज डिलिव्हरीची मागणी केली होती," असंही त्यांनी स्पष्ट केलं. 

 

करावा लागला ट्रोलिंगचा सामना 

गेल्या आठवड्यात कंपनीला यावरुन ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. प्युअर व्हेजसाठी फक्त व्हेज डिलिव्हरीची लोकांनी खिल्ली उडवली होती. फूड चॉईसच्या मदतीनं भेदभावाबाबत होत असल्याचं म्हणतही अनेक मीम्स व्हायरल झाले होते. ग्रीन ब्रँड लाँच झाल्यानंतर एकाच दिवसात कंपनीला तो बंद करावा लागला.

टॅग्स :झोमॅटोव्यवसाय