Join us

'माझा क्रिकेटशी दूर-दूर पर्यंत काहीही संबंध नाही'; रतन टाटा यांनी हे ट्विट का केले?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2023 12:50 PM

उद्योगपती रतन टाटा यांनी आज सकाळी एक ट्विट केले आहे, या ट्विटची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

देशातील प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांनी सोमवारी त्यांच्या नावावर करण्यात येत असलेल्या दाव्याचे खंडन केले. टाटा यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे. टाटा यांनी आयसीसी किंवा इतर कोणत्याही क्रिकेट फॅकल्टीला कोणतीही सूचना दिली नाही. टाटा यांनी लिहिले की, 'मी आयसीसी किंवा कोणत्याही क्रिकेट फॅकल्टीला कोणत्याही खेळाडूला दंड किंवा बक्षीस देण्याबाबत कोणतीही सूचना दिलेली नाही. माझा क्रिकेटशी काहीही संबंध नाही. कृपया असे WhatsApp फॉरवर्ड आणि व्हिडीओ माझ्या अधिकृत प्लॅटफॉर्मवरून येत असल्याशिवाय त्यावर विश्वास ठेवू नका.

गुंतवणूकीचा 'हा' फॉर्म्युला तुम्हाला बनवेल कोट्यधीश, रिटायरमेंटनंतर जगाल आरामाचं आयुष्य

गेल्या काही दिवसापासून सोशल मीडियावर एक फेक न्यूज व्हायरल होत होती. टाटांनी क्रिकेटर राशिद खानला १० कोटी रुपये देण्याचे आश्वासन दिल्याचे सांगण्यात आले. ही माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाली तेव्हा रतन टाटा यांनी स्वतः सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट लिहून  त्याचे खंडन केले.

राशिद खान हा अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा खेळाडू आहे. अलीकडेच, अफगाणिस्तानने वर्ल्ड कप २०२३ मध्ये पाकिस्तानविरुद्ध शानदार विजय नोंदवला होता. या विजयानंतर संघाचा आघाडीचा फिरकी गोलंदाज राशिद खानने अफगाणिस्तानचा झेंडा खांद्यावर ठेवून जल्लोष केला. सोशल मीडियावर अशाही अफवा आहेत की राशिद खानने पाकिस्तानविरुद्धच्या विजयादरम्यान भारतीय ध्वजासह आनंदोत्सव साजरा केला होता, यासाठी आयसीसीने त्याला ५५ लाखांचा दंड ठोठावला होता.

टॅग्स :रतन टाटाट्विटरऑफ द फिल्ड