Nirmala Sitharaman on Indian rupee : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भारतीय रुपयाची घसरण होत नसून अमेरिकन डॉलर मजबूत होत असल्याचे म्हटले आहे. “रुपयाची घसरण रोखण्यासाठी रिझर्व्ह सर्वतोपरी प्रयत्न करत आहे,” असंही त्या म्हणाल्या. सीतारामन सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. वॉशिंग्टन डीसीमध्ये एका पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. या पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने त्यांना भारतीय रुपयाबाबत प्रश्न विचारला होता. “भौगोलिक-राजकीय तणावादरम्यान रुपयाचे मोठ्या प्रमाणात अवमूल्यन झाले आहे. येणाऱ्या काळात रुपयासाठी तुम्हाला कोणती आव्हाने दिसत आहेत आणि तुम्ही त्यांना कसे सामोरे जाल?” असं एका पत्रकारानं सीतारामन यांना विचारलं.
“सर्वप्रथम, मला रुपयाची घसरण होताना दिसत नाही, पण अमेरिकन डॉलर मजबूत होताना दिसत आहे. डॉलर मजबूत होत आहे. त्यामुळे साहजिकच ज्याच्या तुलनेत हे मजबूत होत आहेत त्या करन्सी कमकुवत होतील. इतर उदयोन्मुख बाजार चलनांच्या तुलनेत भारतीय रुपया चांगली कामगिरी करत आहे. मात्र, रुपयाची घसरण रोखण्यासाठी रिझर्व्ह बँक सर्वतोपरी प्रयत्न करत आहे,” असे सीतारामन म्हणाल्या. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची सातत्याने घसरण होत आहे. एका डॉलरचे मूल्य 82.42 रुपया इतके झाले आहे.
#WATCH | USA: Finance Minister Nirmala Sitharam responds to ANI question on the value of Indian Rupee dropping against the Dollar as geo-political tensions continue to rise, on measures being taken to tackle the slide pic.twitter.com/cOF33lSbAT
— ANI (@ANI) October 16, 2022
क्रिप्टोकरन्सीवरहीभाष्य
या पत्रकार परिषदेत अर्थमंत्र्यांनी क्रिप्टोकरन्सीबद्दलही भाष्य केले. "आम्ही क्रिप्टोकरन्सीशी संबंधित मुद्दे G20 देशांसमोर चर्चेसाठी आणू इच्छितो, जेणेकरून सदस्य त्यावर विचार करू शकतील आणि जागतिक स्तरावर फ्रेमवर्क किंवा SOP वर पोहोचू शकतील,” असे लीकापामन म्हणाल्या. देशांना तांत्रिकदृष्ट्या संचालित रेग्युलेटरी फ्रेमवर्क असू शकते. याशिवाय अर्थमंत्र्यांनी व्यापार तुटीवरही भाष्य केले. व्यापार तूट वाढत आहे. मात्र कोणत्याही एका देशाविरुद्ध काही विसंगती आहे की नाही यावर आम्ही लक्ष ठेवून असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
We want to bring up matters related to cryptocurrency on table of G20 so members can discuss it & arrive at a framework or SOP so globally, countries can have a technologically driven regulatory framework: FM Nirmala Sitharaman in Washington DC, on her official visit to USA pic.twitter.com/OEBmUDzftp— ANI (@ANI) October 16, 2022
ईडीवरही प्रश्न
पत्रकार परिषदेत त्यांना ईडीबाबतही प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना ईडी जे काही करते ते पूर्णपणे स्वतंत्र आहे. ते आपले निर्णय घेण्यास स्वतंत्र असल्याचे सीतारामन म्हणाल्या.