Join us

घर घेईन आलिशानच! किंमत ४ काेटींहून जास्त

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2024 5:50 AM

चार काेटी रुपये किंवा त्यापेक्षा जास्त किमतीची घरे लक्झरी घरांच्या श्रेणीत येतात.

लाेकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : देशात लक्झरी आलिशान घरांच्या मागणीत माेठी वाढ नाेंदविण्यात आली आहे. घरांच्या किमती एकीकडे वाढल्या असल्या तरी घर हवे तर आलिशानच, असे चित्र आहे. वर्ष २०२३ मध्ये ७५ टक्के वाढ झाली. येणाऱ्या काळात या सेगमेंटमध्ये आणखी वाढीचा अंदाज आहे. चार काेटी रुपये किंवा त्यापेक्षा जास्त किमतीची घरे लक्झरी घरांच्या श्रेणीत येतात.

१२,९३५लक्झरी घरांची विक्री २०२३मध्ये झाली.

७,३९५घरांची विक्री २०२२मध्ये झाली हाेती.

४ टक्के वाटा लक्झरी घरांचा २०२३मध्ये विक्रीत हाेता.

२ टक्के वाटा या श्रेणीत २०२२ मधील विक्रीत हाेता.

३.२२ लाख घरांची विक्री २०२३मध्ये झाली हाेती.

३.१३लाख याेजना २०२३ मध्ये सादर झाल्या. 

 

टॅग्स :सुंदर गृहनियोजनव्यवसाय