Lokmat Money > बिझनेस न्यूज > 7 मिनिटांची बैठक, धडाधड उडणार नोकऱ्या; या बड्या कंपनीत कर्मचारी कपातीची मोठी घोषणा!

7 मिनिटांची बैठक, धडाधड उडणार नोकऱ्या; या बड्या कंपनीत कर्मचारी कपातीची मोठी घोषणा!

गेल्या जवळपास दोन वर्षांपासून सातत्याने कर्मचारी कपातीच्या बातम्या येत होत्या. मात्र, काही ठिकाणावरून ज्यापद्धतीच्या बातम्या येत आहेत, ते धक्कादायक आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2024 12:10 PM2024-03-18T12:10:55+5:302024-03-18T12:11:41+5:30

गेल्या जवळपास दोन वर्षांपासून सातत्याने कर्मचारी कपातीच्या बातम्या येत होत्या. मात्र, काही ठिकाणावरून ज्यापद्धतीच्या बातम्या येत आहेत, ते धक्कादायक आहेत.

ibm layoff 2024 7-minute meeting, thousands of employees will fired; Big announcement of staff reduction in this big company | 7 मिनिटांची बैठक, धडाधड उडणार नोकऱ्या; या बड्या कंपनीत कर्मचारी कपातीची मोठी घोषणा!

7 मिनिटांची बैठक, धडाधड उडणार नोकऱ्या; या बड्या कंपनीत कर्मचारी कपातीची मोठी घोषणा!

केवळ 7 मिनिटांच्या बैठकीने शेकडो कर्मचाऱ्यांना जबरदस्त झटका दिला आहे. खरे तर, गेल्या जवळपास दोन वर्षांपासून सातत्याने कर्मचारी कपातीच्या बातम्या येत होत्या. मात्र, काही ठिकाणावरून ज्यापद्धतीच्या बातम्या येत आहेत, ते धक्कादायक आहेत. आता अशीच एक बातमी आली आहे IBM मधून.

आयबीएमच्या मार्केटिंग आणि कम्युनिकेशन्स टिम्समध्ये नुकतेच कपातीचे वृत्त आहे. कंपनीचे मुख्य कम्युनिकेशन्स ऑफिसर जोनाथन अडाशेक (Jonathan Adashek) यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना केवळ सात मिनिटांच्या बैठकीत IBM layoff करणार असल्याचे सांगितले आहे. 

मात्र, किती लोकांची नोकरी जाणार हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही. पण, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनी खर्च कमी करण्यासाठी मार्केटिंग आणि कम्युनिकेशन्स विभागात कर्मचारी संख्या कमी करण्याच्या तयारीत आहे.

IBM नं आधीच दिले होते संकेत - 
गेल्या काही दिवसांपासून आयबीएमचे सीईओ अरविंद कृष्णा (Arvind Krishna) हे आपल्या कर्मचाऱ्यांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI)च्या बिझनेस वातावरणासाठी तयार कण्यावर भर देत आहेत. महत्वाचे म्हणजे, येणाऱ्या पाच वर्षांत जवळपास 30% नोकऱ्या (विशेषतः बॅक-ऑफिस) आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि ऑटोमेशनमुळे संपू शकतात, असेही त्यांनी डिसेंबर 2023 मध्ये म्हटले  होते.

आयबीएममधील कर्मचारी कपातीची ही काही पहिलीच वेळ नाही. जानेवारी 2023 मध्येही कंपनीने 3,900 कर्मचाऱ्यांची कपात केली होती. 

Web Title: ibm layoff 2024 7-minute meeting, thousands of employees will fired; Big announcement of staff reduction in this big company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.