Join us  

बँक पीओ, लिपिक आणि अधिकारी होण्यासाठी आजपासून करा अर्ज, जाणून घ्या संपूर्ण माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2022 2:13 PM

IBPS RRB 2022 Notification Out : या भरती प्रक्रियेद्वारे ऑफिस असिस्टंट (क्लर्क) आणि अधिकारी स्केल I, II, III च्या विविध पदांची भरती केली जाणार आहे.

नवी दिल्ली : इंस्टीट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शनने प्रादेशिक ग्रामीण बँकांमध्ये भरतीसाठी आयबीपीएस आरआरबी नोटिफिकेशन 2022 (IBPS RRB Notification 2022) जारी केली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे ऑफिस असिस्टंट (क्लर्क) आणि अधिकारी स्केल I, II, III च्या विविध पदांची भरती केली जाणार आहे.

आयबीपीएस आरआरबीसाठी रजिस्ट्रेशन आज 7 जून 2022 पासून सुरू झाले आहे. पीओ, आयबीपीएस आरआरबी क्लर्क आणि आयबीपीएस आरआरबी एसओसाठी उमेदवार अधिकृत वेबसाइट - ibps.in वर जाऊन अधिक डिटेल्स जाणून घेऊ शकतात. या भरती प्रक्रियेद्वारे एकूण 8081 पदे भरायची आहेत.

विशेष म्हणजे, आयबीपीएस आरआरबी पीओ, आयबीपीएस आरआरबी क्लर्क आणि आयबीपीएस आरआरबी एसओसाठी आवश्यक तारखा समान आहेत. वेळेवर अर्ज करण्यासाठी, उमेदवारांनी या महत्त्वाच्या तारखा लक्षात ठेवाव्यात आणि त्यानुसार अर्ज करावे. काही समस्या असल्यास आयबीपीएस आरआरबी अधिसूचना 2022 पाहू शकता. 

आयबीपीएस आरआरबी अधिसूचना 2022 नुसार, 43 बँकांमध्ये भरती होणार आहे. सर्व बँकांमध्ये प्रत्येक पदासाठी वेगवेगळी पदे असून त्यासाठी भरती आयबीपीएस आरआरबीमार्फत केली जात आहे. आयबीपीएस आरआरबी पीओ, आयबीपीएस आरआरबी क्लर्क आणि आयबीपीएस आरआरबी एसओसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना अर्ज शुल्क देखील भरावे लागेल.

ऑफिसर स्केल I, II, III आणि ऑफिस असिस्टंटसाठी SC/ST/PwBD श्रेणीतील उमेदवारांना 175 रुपयांची अर्ज फी भरावी लागेल तर इतर सर्वांना 850 रुपये भरावे लागतील. या भरतीसाठी आज 7 जूनपासून रजिस्ट्रेशन सुरू झाले आहे. रजिस्ट्रेशन करण्याची अंतिम तारीख 27 जून 2022 आहे. या पूर्व परीक्षा प्रशिक्षणासाठी, पीईटी 18 ते 23 जुलै दरम्यान होणार आहे. तर आयबीपीएस आरआरबी पीओ, एसओ, लिपिक ऑनलाइन परीक्षा ऑगस्टमध्ये होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :बँकनोकरी