नवी दिल्ली : तुम्ही आयसीआयसीआय (ICICI Bank) बँकेचे ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. स्टेट बँक ऑफ इंडियानंतर (State Bank of India) आता आयसीआयसीआय बँकेनेएटीएममधून (ATM) रोख रक्कम काढण्याच्या आणि चेकबुकसाठी द्याव्या लागणाऱ्या शुल्कात वाढ केली आहे. हे नवीन शुल्क ऑगस्टपासून लागू होणार आहे. नवीन शुल्क सॅलरी अकाउंट्ससह सर्व डोमिस्टिक सेव्हिंग अकाउंट होल्डरवर लागू होणार आहे.
एका महिन्यात ATM मधून किती वेळा पैसे काढता येणार?ICICI बँकेचे ग्राहक आता महिन्यातून केवळ तीन वेळा एटीएममधून विनाशुल्क रोख रक्कम काढू शकतात. हा नियम मुंबई, चेन्नई, कोलकाता, बंगळुरु आणि हैदराबाद सारख्या मेट्रो शहरांसाठी लागू आहे. या मेट्रो शहरांव्यतिरिक्त इतर सर्व ठिकाणी केवळ 5 वेळा विनाशुल्क रोखरक्कम काढता येईल.
आता किती द्यावा लागेल शुल्क?मुंबई, चेन्नई, कोलकाता, बंगळुरु आणि हैदराबाद सारख्या मेट्रो शहरांमध्ये तुम्ही जर चौथ्यांदा आयसीआयसीआय बँकेच्या एटीएममधून पैसे काढत असाल तर तुम्हाला त्यानंतरच्या प्रत्येक ट्रान्झॅक्शनसाठी 20 रुपये शुल्क द्यावे लागेल. याशिवाय तुम्ही जर एटीएममधून कोणतंही नॉन-फायनान्शिअल ट्रान्झॅक्शन करत असाल, जसे की युजर तपशील बदलणे, मिनी स्टेटमेंट काढणे, बॅलन्सचा तपशील जाणून घेणे इ तर तुम्हाला 8.50 रुपये शुल्क द्यावे लागेल. नवीन शुल्क सिल्वर, मॅगनम, टायटॅनियम आणि वेल्थ कार्ड होल्डर्सवर लागू होईल.
होम ब्रँचमध्ये कॅश ट्रांजक्शनवर किती शुल्क?1 ऑगस्टपासून दरमहा 4 फ्री ट्रांजक्शन असणार आहेत. यानंतर तुम्ही यापेक्षा जास्त ट्रांजक्शन करून पैसे काढले तर तुम्हाला अधिक शुल्क द्यावे लागेल. बँकेच्या वेबसाइटनुसार मोफत मर्यादेपेक्षा अधिक व्यवहार करण्यावर प्रत्येक व्यवहारासाठी 150 रुपये द्यावे लागतील. ऑगस्ट महिन्यापासून ICICI च्या ग्राहकांना त्यांच्या होम ब्रँचमधून दरमहा 1 लाख रुपये विनाशुल्क काढता येतील. त्यापेक्षा जास्त रकमेचा व्यवहार केल्यास प्रति हजार रुपयांसाठी 5 रुपये शुल्क द्यावे लागेल. हे शुल्क कमीत कमी 150 रुपये असेल.
होमब्रँच नसेल तरी किती शुल्क द्यावे लागेल?होम ब्रँच नसणाऱ्या शाखेमध्ये प्रति दिन 25000 रुपयांच्या व्यवहारांवर कोणतंही शुल्क नाही आहे. त्यापेक्षा जास्त रकमेचा व्यवहार केल्यास प्रति हजार रुपयांसाठी 25 रुपये शुल्क द्यावे लागेल. यामध्येही मिनिमम शुल्क 150 रुपयांचे असेल.
थर्ड पार्टी ट्रांजक्शनथर्ड पार्टी ट्रांजक्शनसाठी देखील 25000 रुपयांची मर्यादा आहे. यावर देखील 150 रुपयांचे शुल्क आकारले जाईल. एका दिवसात तुम्ही 25000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम थर्ड पार्टीला ट्रान्सफर करू शकत नाही.
चेकबुकसाठी किती द्यावे लागेल शुल्क?तुम्हाला वर्षाला 25 चेकबुकसाठी कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही. यानंतर तुम्हाला अतिरिक्त चेक बुकसाठी 20 रुपये प्रति 10 पानं द्यावे लागतील.
ICICI बँक रेग्यूलर प्लस सॅलरी अकाउंटजर तुमच्याकडे देखील हे अकाउंट आहे तर महिन्यामध्ये 4 शुल्क मोफत आहेत. त्यानंतर प्रति हजार रुपयांसाठी पाच रुपयांचे शुल्क द्यावे लागेल. यामध्ये देखील मिनिमम 150 रुपये शुल्क कापले जाईल.