Join us  

ICICI बँकेच्या एफडीवर मिळेल बंपर रिटर्न, व्याजदरात मोठी वाढ!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2023 5:02 PM

icici bank : आयसीआयसीआय बँकेने व्याजदरात किती वाढ केली आहे, ते जाणून घ्या...

नवी दिल्ली : खासगी क्षेत्रातील बँक आयसीआयसीआयने (ICICI) बल्क एफडीवरील (FD) व्याजदरात वाढ केली आहे. बँकेने एफडीवर २ कोटींवरून ५ कोटी रुपयांपर्यंत वाढ केली आहे. हे नवीन दर आज ७ फेब्रुवारी २०२३ पासून लागू झाले आहेत. ७ दिवसांपासून ते १० वर्षांपर्यंतच्या एफडीवर बँक ४.५० टक्के ते ७.१५ टक्के व्याज देत आहे. बँक १५ महिन्यांच्या एफडीवर सर्वाधिक ७.१५ टक्के व्याज देत आहे. दरम्यान, आयसीआयसीआय बँकेने व्याजदरात किती वाढ केली आहे, ते जाणून घेऊया...

ICICI बँकेचे बल्क एफडी व्याजदर…७ दिवस ते १४ दिवस : सर्वसामान्यांसाठी ४.५० टक्के, ज्येष्ठ नागरिकांसाठी ४.५० टक्के १५ दिवस ते २९ दिवस : सर्वसामान्यांसाठी ४.५० टक्के, ज्येष्ठ नागरिकांसाठी ४.५० टक्के३० दिवस ते ४५ दिवस : सर्वसामान्यांसाठी ५.२५ टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी ५.२५ टक्के४६ दिवस ते ६० दिवस : सर्वसामान्यांसाठी ५.५० टक्के, ज्येष्ठ नागरिकांसाठी ५.५० टक्के ६१ दिवस ते ९० दिवस : सामान्यांसाठी ५.७५ टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ५.७५ टक्के

९१ दिवस ते १२० दिवस : सामान्य लोकांसाठी ६.२५ टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी ६.२५ टक्के१२१ दिवस ते १५० दिवस : सामान्य लोकांसाठी ६.२५ टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी ६.२५ टक्के१५१ दिवस ते १८४ दिवस : सर्वसामान्यांसाठी ६.२५ टक्के - ज्येष्ठ नागरिकांसाठी ६.२५ टक्के211 दिवस ते 270 दिवस: सामान्य लोकांसाठी ६.५० टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी ६.५० टक्के271 दिवस ते 289 दिवस: सामान्य लोकांसाठी ६.६५ टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी ६.६५ टक्के

१ वर्ष ते ३८९ दिवस : सामान्य लोकांसाठी ७.१० टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी ७.१० टक्के३९० दिवस ते १५ महिन्यांपेक्षा कमी : सामान्य लोकांसाठी ७.१० टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी ७.१० टक्के१५ महिने ते १८ महिन्यांपेक्षा कमी : सामान्य लोकांसाठी ७.१५ टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी ७.१५ टक्के२ वर्षे १ दिवस ते ३ वर्षे : सर्वसामान्यांसाठी ७.०० टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी ७.०० टक्के३ वर्षे १ दिवस ते ५ वर्षे : सर्वसामान्यांसाठी ६.७५ टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी ६.७५ टक्के.

टॅग्स :आयसीआयसीआय बँकव्यवसाय