Lokmat Money > बिझनेस न्यूज > 'या' बँकेने ग्राहकांसाठी लाँच केली इंटरनेट बँकिंगवर इंस्टंट EMI सर्व्हिस, असा होणार फायदा...

'या' बँकेने ग्राहकांसाठी लाँच केली इंटरनेट बँकिंगवर इंस्टंट EMI सर्व्हिस, असा होणार फायदा...

ICICI Bank launches instant EMI facility making high value items affordable to customers : इंटरनेट बँकिंग प्लॅटफॉर्मवर इन्स्टंट ईएमआय सुविधा देणारी ही पहिली बँक आहे. यापूर्वी कोणत्याही बँकेने ग्राहकांना ही सुविधा दिली नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2021 03:44 PM2021-03-24T15:44:01+5:302021-03-24T15:45:54+5:30

ICICI Bank launches instant EMI facility making high value items affordable to customers : इंटरनेट बँकिंग प्लॅटफॉर्मवर इन्स्टंट ईएमआय सुविधा देणारी ही पहिली बँक आहे. यापूर्वी कोणत्याही बँकेने ग्राहकांना ही सुविधा दिली नाही.

ICICI Bank launches instant EMI facility making high value items affordable to customers  | 'या' बँकेने ग्राहकांसाठी लाँच केली इंटरनेट बँकिंगवर इंस्टंट EMI सर्व्हिस, असा होणार फायदा...

'या' बँकेने ग्राहकांसाठी लाँच केली इंटरनेट बँकिंगवर इंस्टंट EMI सर्व्हिस, असा होणार फायदा...

Highlightsया सुविधेसाठी बँकेने BillDesk आणि Razorpay सोबत भागीदारी केली आहे.

नवी दिल्ली : खासगी क्षेत्रातील आयसीआयसीआय बँकेने (ICICI Bank) आपल्या ग्राहकांसाठी विशेष सुविधा सुरू केली आहे. या सुविधेमध्ये ग्राहकांना इंटरनेट बँकिंग प्लॅटफॉर्मवर (Banking Platform) इंस्टंट ईएमआय (EMI) सेवा मिळणार आहे. (ICICI Bank launches instant EMI facility making high value items affordable to customers)

'EMI@इंटरनेट बँकिंग' असे या सुविधेचे नाव आहे. या बँक सुविधेच्या सहाय्याने ग्राहकांना डिजिटल मार्गाने EMI चा लाभ मिळणार आहे. याद्वारे प्री-अप्रूव्ह्ड ग्राहकांना पाच लाखांपर्यंतचे उच्च मूल्य व्यवहार (high-value transactions) मासिक हप्त्यांमध्ये देखील सहजपणे बदलले जाऊ शकतात. 

इंटरनेट बँकिंग प्लॅटफॉर्मवर इन्स्टंट ईएमआय सुविधा देणारी ही पहिली बँक आहे. यापूर्वी कोणत्याही बँकेने ग्राहकांना ही सुविधा दिली नाही. लाइव्ह मिंटच्या वृत्तानुसार, या सुविधेसाठी बँकेने BillDesk आणि Razorpay सोबत भागीदारी केली आहे.

कसा घेऊ शकता EMI @ Internet Banking सुविधेचा लाभ?
- यासाठी आपल्याला मर्चेंट वेबसाइट आणि अॅपवर प्रोडक्ट किंवा सर्व्हिस निवडा.
- यानंतर पेमेंट मोडमध्ये "ICICI Bank Internet Banking" वर क्लिक करा.
- तुम्हाला तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड इंटर करावा लागेल
-  पेमेंट डिटेल्स पेज "Convert to EMI instantly" वर टॅब करा.
- पेमेंट टेनओर निवाडा
-  रजिस्टर्ड मोबाइव नंबरवर आलेला OTP द्वारे इंटर करा. यानंतर तुमचे पेमेंट होईल.

बँक अधिकाऱ्याने दिली माहिती
लाइव्ह मिंटच्या वृत्तानुसार, ही सुविधा लाँच करताना बँकेचे अधिकारी सुदीप्त रॉय म्हणाले, " आमची EMI @ इंटरनेट बँकिंगची नवीन सेवा ग्राहकांना उच्च मूल्य व्यवहारासाठी ईएमआय सुविधा प्रदान करेल. यामुळे ग्राहकांची सोय देखील वाढेल. कारण, हे सर्व पूर्णपणे डिजिटल आणि वेगवान असेल. आम्हाला विश्वास आहे की ही सुविधा आमच्या लाखों प्री अप्रूव्ह्ड ग्राहकांना त्यांच्या गरजांसाठी पूर्णपणे संपर्करहित, वेगवान, डिजिटल आणि सुरक्षित मार्गाने खरेदी करण्याची सुविधा देईल."

(नोकरदारांसाठी मोठी बातमी! पीएफमधील 5 लाखांपर्यंतची गुंतवणूक झाली करमुक्त)

या सुविधेचे फायदे...
या सुविधेद्वारे बँकेचे ग्राहक 50 हजार ते 5 लाख रुपयांपर्यंतचे प्रोडक्ट्स खरेदी करू शकतात. याशिवाय तीन महिन्यांपासून, सहा महिने, नऊ महिन्यांत आणि 12 महिन्यांपर्यंत ग्राहक ईएमआयसाठी कोणताही पर्याय निवडू शकतात. तसेच, बँकेच्या इंटरनेट बँकिंग प्लॅटफॉर्मद्वारे पैसे भरताना ग्राहक त्यांचे उच्च मूल्य व्यवहार त्वरित आणि डिजीटल पद्धतीने ईएमआयमध्ये कनव्हर्ट करू शकतात.याशिवाय, ग्राहक त्यांच्या पसंतीच्या गॅझेटसाठी किंवा विमा प्रीमियमसाठी किंवा आपल्या मुलाच्या शाळेच्या फीसाठी किंवा सुट्टीसाठी ही सुविधा निवडू शकतात.
 

Web Title: ICICI Bank launches instant EMI facility making high value items affordable to customers 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.