देशातील खासगी क्षेत्रातील मोठ्या बँकांपैकी एक असलेल्या बँकेनं आता क्रेडिट कार्डाच्या माध्यमातून घरभारडं भरण्यासाठी मोठा झटका दिला आहे. आयसीआयसीआय बँकेनं आता क्रेडिट कार्डाद्वारे घरभाडं भरणाऱ्यांकडून 1 टक्का शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. आयसीआयसीआय बँकेनं यासंदर्भातल आपल्या ग्राहकांना एसएमएसद्वारे माहिती दिली आहे.
’२० ऑक्टोबरपासून घरभाडं भरण्यासाठी आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडिट कार्डाचा वापर केल्यास सर्व व्यवहारांवर 1 टक्का शुल्क आकारलं जाईल,’ असा संदेश बँकेनं आपल्या ग्राहकांना पाठवला आहे. हा संदेश त्या कार्डधारकांसाठी आहे जे आपल्या क्रेडिट कार्डाचा वापर क्रेडिट, रेड जिराफ, मायगेट, पेटीएम आणि मॅजिकब्रिक्ससारख्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून घरभाडं भरण्यासाठी करतात.
आतापर्यंत शुल्क नव्हतंआतापर्यंत बँक किंवा क्रेडिट कार्डाच्या माध्यमातून अशाप्रकारच्या देवाणघेवाणीवर कोणतंही शुल्क आकारलं जात नव्हतं. आयसीआयसीआय बँक आपल्या ग्राहकांकडून क्रेडिट कार्डाच्या माध्यमातून असं शुल्क आकारणारी पहिली बँक आहे.