मुंबई : आयसीआयसीआय बँकेच्या नफ्यात ५५.८४ टक्के घट झाली आहे. बँकेला जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत ९०८.८८ कोटी रुपयांचा नफा झाला. पण मागीलवर्षी या तिमाहीमध्ये बँकेला २०५८.१९ कोटी रुपयांचा नफा झाला होता.बँकेला बुडित कर्जांपोटी ३९४४ कोटी रुपयांची तरतूद करावी लागली. हेच नफा कमी होण्याचे मुख्य कारण ठरले. बुडित कर्ज(एनपीए) प्रमाणात घट झाली आहे. मागील तिमाहीत बँकेचे एनपीए प्रमाण ८.८१ टक्के होते. ते आता ८.५४ टक्क्यांवर आले आहे.
आयसीआयसीआय बँकेच्या नफ्यात ५५ टक्के घट
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2018 11:28 PM