Lokmat Money > बिझनेस न्यूज > ICICI बँकेच्या ग्राहकांसाठी मोठी बातमी, Credit Card चे बिल वेळेवर भरले नाही तर भरावा लागेल मोठा दंड!

ICICI बँकेच्या ग्राहकांसाठी मोठी बातमी, Credit Card चे बिल वेळेवर भरले नाही तर भरावा लागेल मोठा दंड!

ICICI Bank : आयसीआयसीआय बँक 10 फेब्रुवारी 2022 पासून क्रेडिट कार्डच्या शुल्कमध्ये बदल करणार आहे. या बदलानुसार आता क्रेडिट कार्डमधून पैसे काढणेही (Cash Withdrawal) महाग होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2022 01:56 PM2022-01-09T13:56:58+5:302022-01-09T13:57:29+5:30

ICICI Bank : आयसीआयसीआय बँक 10 फेब्रुवारी 2022 पासून क्रेडिट कार्डच्या शुल्कमध्ये बदल करणार आहे. या बदलानुसार आता क्रेडिट कार्डमधून पैसे काढणेही (Cash Withdrawal) महाग होणार आहे.

icici bank revises fees on credit cards late payment charge up to rs1200 | ICICI बँकेच्या ग्राहकांसाठी मोठी बातमी, Credit Card चे बिल वेळेवर भरले नाही तर भरावा लागेल मोठा दंड!

ICICI बँकेच्या ग्राहकांसाठी मोठी बातमी, Credit Card चे बिल वेळेवर भरले नाही तर भरावा लागेल मोठा दंड!

नवी दिल्ली : कोरोना महामारीच्या काळात क्रेडिट कार्डचा (Credit Card) वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. क्रेडिट कार्डमुळे शॉपिंग करणे अगदी सोपे आहे, परंतु क्रेडिट कार्डचे बिल वेळेवर भरणे देखील आवश्यक आहे. बिल वेळेवर भरले नाही तर मोठा दंड भरावा लागेल. जर तुम्ही आयसीआयसीआय (ICICI) बँकेचे ग्राहक असाल आणि क्रेडिट कार्ड वापरत असाल, तर तुम्हाला बिल भरण्यात उशीर झाल्यास पूर्वीपेक्षा जास्त दंड भरावा लागेल.

दरम्यान, आयसीआयसीआय बँक 10 फेब्रुवारी 2022 पासून क्रेडिट कार्डच्या शुल्कमध्ये बदल करणार आहे. या बदलानुसार आता क्रेडिट कार्डमधून पैसे काढणेही (Cash Withdrawal) महाग होणार आहे. बँकेने एमराल्ड वगळता सर्व कार्डांसाठी उशीरा पेमेंट (Late Payment) शुल्क देखील सुधारित केले आहे.

1,200 रुपयांपर्यंत दंड भरावा लागेल
10 फेब्रुवारीनंतर, जर तुमच्या क्रेडिट कार्डची थकबाकी 10,000 रुपयांपर्यंत असेल, तर उशिरा पेमेंट केल्यास 750 रुपये दंड आकारला जाईल. 25,000 रुपयांपर्यंतच्या थकबाकीसाठी 900 रुपये आणि 50,000 रुपयांपर्यंतच्या थकबाकीसाठी 1,000 रुपये आहे. जर शिल्लक 50,000 रुपयांपेक्षा जास्त असेल, तर 1,200 रुपयांपर्यंत लेट पेमेंट शुल्क म्हणून भरावे लागेल. याशिवाय, ग्राहकाच्या बचत बँक खात्यातून 50 रुपये आणि जीएसटी कापला जाईल.

या ग्राहकांना लेट पेमेंट भरावे लागणार नाही
ज्यांच्या क्रेडिट कार्डची थकबाकी 100 रुपयांपेक्षा कमी आहे, अशा आयसीआयसीआय बँक ग्राहकांवर कोणतेही विलंब शुल्क आकारले जाणार नाही. 100 ते 500 रुपयांच्या शिल्लक रकमेवर 100 रुपये विलंब शुल्क भरावे लागेल. जर तुमची क्रेडिट कार्ड शिल्लक रुपये 501 ते 5,000 रुपयांच्या दरम्यान असेल, तर बँक तुम्हाला उशिरा पेमेंटसाठी 500 रुपये विलंब शुल्क आकारेल.

क्रेडिट कार्डद्वारे पैसे काढण्यासाठी भरावे लागेल शुल्क
आयसीआयसीआय बँकेच्या म्हणण्यानुसार, क्रेडिट कार्डद्वारे पैसे काढण्यासाठी ग्राहकाला किमान 500 रुपये शुल्क भरावे लागेल. हे शुल्क 20,000 रुपयांपर्यंतच्या रोख रकमेवर लागू होईल. यापेक्षा जास्त रक्कम काढल्यास एकूण रकमेच्या २.५ टक्के दंड भरावा लागेल. चेक रिटर्न आणि ऑटो डेबिट रिटर्न अयशस्वी झाल्यास, किमान 500 रुपये दंड भरावा लागेल.
 

Web Title: icici bank revises fees on credit cards late payment charge up to rs1200

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.