मुंबई : देशाच्या बँकिंग उद्योग अग्रगण्य असलेल्या आयडीबीआय बँकेने सूक्ष्म व्यवसाय, अल्पसंख्याक समाज आणि समाजातील दुर्बल घटकांना आणि त्यांचा व्यावसायिक हुरुप वाढविण्याच्या हेतूने आर्थिक सहाय्य वाढविण्याची घोषणा केली आहे.
तळागाळातून उद्योजकता वाढीस लागावी व अनेक लहान मोठ्या उद्योगांनाही वित्तसहाय्यामुळे उद्योगात भक्कमपणे उभे राहता यावे यासाठी, बँकेने वाढीव अर्थसहाय्याचे धोरण स्वीकारले आहे.
अशाच एका प्रकारात पुणे येथील मोहम्मद युसुफ शेख चालवित असलेल्या रायो युनिसेक्स सलूनसाठी २८ लाख रुपयांचे वाढीव अर्थसहाय्य बँकेने त्याला दिले आहे.
बँकेचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी किशोर खरात यांच्या हस्ते याचे उद्घाटन करण्यात आले. घाऊक व किरकोळ व्यापारी, उद्योजक, व्यावसायिक आणि स्वयंरोजगार, वैद्यकीय व्यावसायिक आणि मोठ्या तसेच मध्यम आकाराच्या कॉर्पोरेट विक्रेत्यांसाठी आयडीबीआय बँकेच्या काही योजना आहेत.
त्या योजनेअंतर्गत दुर्गम भागातील लोकांपर्यंत बँकेने केलेल्या आर्थिक तरतुदी व्यवस्थितपणे पोहोचविण्यासाठी बीसी/बीएफ चॅनल सुरू करण्यात आले आहे. तसेच या माध्यमातून विविध मेळावे घेऊन गरजूंपर्यंत कर्ज पोहोचविण्यात येत असल्याचे बँकेने प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
आयडीबीआयकडून अर्थसाहाय्यात वाढ
देशाच्या बँकिंग उद्योग अग्रगण्य असलेल्या आयडीबीआय बँकेने सूक्ष्म व्यवसाय, अल्पसंख्याक समाज आणि समाजातील दुर्बल घटकांना आणि त्यांचा व्यावसायिक हुरुप वाढविण्याच्या हेतूने
By admin | Published: January 14, 2016 02:08 AM2016-01-14T02:08:36+5:302016-01-14T02:08:36+5:30