Join us

Recruitment 2021: 'या' बँकेत नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी, तब्बल 1 कोटी रूपयांचे पॅकेज

By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2021 5:41 PM

Recruitment 2021: या पदासाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवार 16 जून या अंतिम तारखेपर्यंत recruitment@idbi.co.in वर अर्ज पाठवू शकतात.

ठळक मुद्देकोणतीही बँक किंवा वित्तीय संस्थेच्या आयटी युनिटमध्ये प्रमुख जबाबदारी सांभाळलेल्या व्यक्तीला प्राधान्य दिले जाईल.

नवी दिल्ली : इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बॅंक ऑफ इंडिया लिमिटेड (Industrial Development Bank of India Ltd) अर्थात आयडीबीआय बँकेने कराराच्या आधारे माहिती तंत्रज्ञान (IT) प्रमुख पदासाठी भरती काढली आहे. या पदाचा सुरूवातीचा कार्यकाळ तीन वर्षांचा आहे. परंतु तो पाच वर्षांपर्यंत वाढविला जाऊ शकतो. या पोस्टबद्दल सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पगार. या पदासाठी बँक वार्षिक पगार 1 कोटी म्हणजेच 100 लाख रुपये देत आहे. जाणून घ्या, याबद्दल... (idbi bank job offer for it professionals salary 1 crore rupees check how know details)

अर्ज करण्यासाठी :या पदासाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवार 16 जून या अंतिम तारखेपर्यंत recruitment@idbi.co.in वर अर्ज पाठवू शकतात.

कामाचा अनुभव :या पदासाठी उमेदवाराकडे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कामाचा 20 वर्षांचा अनुभव असावा. त्यापैकी किमान 10 वर्षे वरिष्ठ स्तरावर काम केलेले असावे. कोणतीही बँक किंवा वित्तीय संस्थेच्या आयटी युनिटमध्ये प्रमुख जबाबदारी सांभाळलेल्या व्यक्तीला प्राधान्य दिले जाईल.

शैक्षणिक पात्रता :अर्जदाराकडे भारत सरकारद्वारे मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा अन्य संस्थेची अभियांत्रिकी शाखेतील (Engineering) पदव्युत्तर पदवी किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन, संगणक विज्ञान किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिकल, माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन किंवा कॉम्प्यूटर अॅप्लिकेशनमधील पदव्युत्तर पदवी असावी.

वय : या पदासाठी अर्ज करण्यासाठी किमान वयोमर्यादा 45 वर्षे आणि कमाल वयोमर्यादा 55 वर्षे आहे.

वार्षिक पॅकेज :या पदासाठी बँक अंदाजित वार्षिक सीटीसी (CTC) 80 लाख ते 1 कोटी रुपये म्हणजेच 100 लाख रुपये वेतन देत आहे. आवश्यक पात्रतेचे निकष पूर्ण करणारे उमेदवार 16 जून 2021 रोजी किंवा त्यापूर्वी recruitment@idbi.co.in वर अर्ज पाठवू शकतात.

पोस्टिंग :या पदासाठी मुंबईत (Mumbai) पोस्टिंग होण्याची अधिक शक्यता आहे. मात्र बँकेच्या आवश्यकतेनुसार पोस्टिंग करण्याचा अधिकार बँकेकडे राखीव आहे.

अधिसूचना या ठिकाणी पाहण्यासाठी :

>> बँकेच्या https://www.idbibank.in/index.asp वेबसाइटला भेट द्या.

>> होम पेजवर ‘करिअर’ टॅबवर क्लिक करा

>> त्यानंतर करंट ओपनिंगवर क्लिक करा

>> Detailed Advertisement वर क्लिक करा.

टॅग्स :बँकनोकरीव्यवसाय