Join us

आयडिया आणि एअरसेलचे नो कनेक्ट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2018 12:16 AM

दूरसंचार कंपनी आयडिया सेल्युलरने एअरसेलची आंतरजोडणी सुविधा (इंटरकनेक्ट सर्व्हिसेस) निलंबित केली आहे.

नवी दिल्ली : दूरसंचार कंपनी आयडिया सेल्युलरने एअरसेलची आंतरजोडणी सुविधा (इंटरकनेक्ट सर्व्हिसेस) निलंबित केली आहे. एअरसेलकडे आंतरजोडणी शुल्काची मोठी रक्कम थकलेली असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे आयडियाने म्हटले आहे.आयडियाने म्हटले आहे की, एअरसेलने शुल्काची रक्कम जमा करताच, आंतरजोडणी सुविधा तातडीने पूर्ववत केली जाईल. थकीत रकमेसाठी नोव्हेंबर २0१७ पासून एअरसेलकडे पाठपुरावा केला जात आहे. तथापि, कंपनीने प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे आंतरजोडणी सेवा निलंबित करण्याचा निर्णय आम्हाला घ्यावा लागला.सूत्रांनी सांगितले की, एका दूरसंचार कंपनीच्या नेटवर्कवरून दुसºया कंपनीच्या नेटवर्कवर फोन करण्यासाठी आंतरजोडणी सुविधा गरजेची असते. आयडियाने ही सेवा बंद केल्याने, एअरसेलच्या नेटवर्कवरून आता आयडिया नेटवर्कवर फोन करता येणार नाही.