नवी दिल्ली : आयडिया सेल्युलर आणि व्होडाफोन इंडियाचे बहुचर्चित विलीनीकरण ३० जूनअखेर होण्याची शक्यता मंदावली आहे. दूरसंचार विभाग सुमारे ४,७०० कोटी रुपयांची नव्याने मागणी करण्याच्या विचारात असल्यामुळे हे विलीनीकरण लांबेल.
आयडिया सेल्युलरशी विलीन होण्यापूर्वी ही रक्कम व्होडाफोन इंडियाकडून मागितली जाईल. व्होडाफोन इंडियाने आपले सगळे विभाग एका कंपनीत विलीन केले असून, कंपनीकडून वन टाइम स्पेक्ट्रम चार्जेसचे (ओटीएससी) सुमारे ४,७०० कोटी रुपये येणे आहेत. विलीनीकरणापूर्वी व्होडाफोनने एक तर ही रक्कम भरावी किंवा बँक गॅरंटी द्यावी, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले. व्होडाफोनने २०१५ मध्ये व्होडाफोन ईस्ट, व्होडाफोन साउथ, व्होडाफोन सेल्युलर आणि व्होडाफोन डिजिलिंक या आपल्या सहयोगी कंपन्या व्होडाफोन मोबाइल सव्हिसेसमध्ये विलीन केल्या होत्या.
आयडिया-व्होडाफोन विलीनीकरण लांबले
आयडिया सेल्युलर आणि व्होडाफोन इंडियाचे बहुचर्चित विलीनीकरण ३० जूनअखेर होण्याची शक्यता मंदावली आहे.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 03:27 AM2018-06-25T03:27:04+5:302018-06-25T03:27:18+5:30