नवी दिल्ली: सध्या देशात महागाई वाढतच आहे. त्यामुळे अनेक बँकांमध्ये फिक्स डिपॉझिट करण्यासही ग्राहकांना परवडत नाही. त्यामुळे बँकांमधून अनेकांनी फिक्स डिपॉझिट काढून घेतले आहेत, यातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. देशातील दोन मोठ्या बँकांनी फिक्स डिपॉझिटच्या व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. आयडीएफसी आणि बंधन बँकेने फिक्स डिपॉझिटच्या व्याजदरात वाढ केली आहे.
आयडीएफसी फस्ट बँकेने २ कोटीपासून २५ कोटीपर्यंत एफडीवर व्याज देण्याचा निर्णय घेतला आहे. यासारखा बंधन बँकेनेही २ कोटी आणि यापेक्षा जास्त एफडीवर जास्त व्याज देण्याचा निर्णय घेतला आहे. बँका आता एफडीवर ७.८० टक्क्यांपर्यंत व्याज देत आहे. नवे व्याजदर २६ सप्टेंबरपासून लागू झाले आहेत.
एका अहवालानुसार, आयडीएफसी फस्ट बँक ३६६ दिवसांपासून ते ७३१ दिवस कालावधीपर्यंत २ कोटी पासून ते २५ कोटीपर्यंतच्या एफडीवर ७.१० टक्के व्याज देणार आहे. यासारखे ७३२ दिवस ते १० वर्षापर्यंत पूर्ण होणाऱ्या एफडीवर बँक ७ टक्क्यांचे वर्षिक दराने व्याज देणार आहे. बँकेने २७१ दिवसापासून ३६५ दिवसापर्यंत पूर्ण करणाऱ्या एफडीवर ६.८५ टक्के व्याजदर देण्याचा निर्णय घेतला आहे. जी १८१ दिवसापासून २७० दिवसात पूर्ण होणाऱ्या एफडीवर आता ग्राहकांना ६.४५ टक्के व्याज मिळणार आहे.
९२ दिवसापासून ते १८० दिवसापर्यंत पूर्ण होणाऱ्या एफडीवर ६.३५ टक्के व्याज देण्याचा निर्णय बँकेने घेतला आहे. ६१ ते ९१ दिवसाच्या कालावधीच्या एफडीवर ५.६० टक्के आणि ४६ ते ६० दिवस कालावधीच्या एफडीवर बँक ४.७० टक्क्यापासून ते ४.९५ टक्के व्याजदर देणार आहे.
गाडी खरेदी करण्याचा विचार करताय? मग जाणून घ्या कोणते लोन नेमके चांगले
बंधन बँकेनेही व्याजदरात केली वाढ
बंधन बँकेने २ कोटीपासून ते ५० कोटीपर्यंतच्या एफडीवरील व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ३६५ दिवस ते १५ महिने ५ वर्षापेक्षा कमी असणारी एफडीवर व्याजदर ७.२५ टक्के देण्याचा निर्णय घेतला आहे. १५ महिन्यांपासून ते ५ वर्षापेक्षा कमी कालावधीच्या एफडीवर ६.१५ टक्के व्याजदर मिळणार आहे. बँक ५ वर्षे ते १० वर्षांच्या कालावधी होणाऱ्या अफडीवर ५ टक्के व्याज देत आहे.