Join us

दर्यादिल MD... बँकेतील 5 कर्मचाऱ्यांना गिफ्ट दिले 9 लाख शेअर, ड्रायव्हर-ट्रेनरचीही दिवाळी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2022 10:29 AM

बँकेद्वारे SEBI कडे देण्यात आलेल्या माहितीतून याबाबतचा खुलासा झाला आहे. कुठल्याही प्रकारचा लाभ मिळवण्याचा हा हेतू नसल्याचंही बँकेने स्ष्ट केलं आहे.

नवी दिल्ली - उद्योजक किंवा गर्भश्रीमंत माणसं हे एखाद्यावर विश्वास टाकला की त्या व्यक्तींसाठी काहीही करतात. काही दिवसांपूर्वीच देशातील श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांनी त्यांचा उजवा हात असलेल्या मनोज मोदींना शानदार गिफ्ट होतं. त्यांच्या प्रामाणिकपणाचं फळ म्हणून अंबानींनी त्यांना एक आलिशान इमारतच गिफ्ट केली. आता, कार्पोरेट क्षेत्रातील आयडीएफसी फर्स्ट बँकेचे एमडी आणि सीईओ वी. वैद्यनाथन यांनी आपल्या खास स्टाफला तब्बल 9 लाख शेअर गिफ्ट केले आहेत. 

बँकेद्वारे SEBI कडे देण्यात आलेल्या माहितीतून याबाबतचा खुलासा झाला आहे. कुठल्याही प्रकारचा लाभ मिळवण्याचा हा हेतू नसल्याचंही बँकेने स्ष्ट केलं आहे. वी वैद्यनाथन यांनी ज्या कर्मचाऱ्यांना हे गिफ्ट शेअर केलं आहे, त्यामध्ये, ट्रेनर, हाऊस हेल्पर, ड्रायव्हर आणि ऑफिसच्या सपोर्ट स्टाफचा सहभाग आहे. या सर्व कर्मचाऱ्यांना घर खरेदी करण्यासाठी बँकेतर्फे हे शेअर देण्यात आले आहेत. 

9 लाख इक्विटी शेअर गिफ्ट

वैद्यनाथन यांनी ट्रेनर रमेश राजू यांस 3 लाख, हाऊस हेल्पर प्रांजल नरवेकर आणि ड्रायव्हर ए.पी. मुनापार यांना प्रत्येकी 2-2 लाख इक्विटी शेअर देण्यात आले आहेत. त्यासोबतच, ऑफिस सपोर्ट स्टाफ दिपक पथारे आणि हाऊस हेल्पर संतोष जोगले यांना 1-1 लाख रुपयांचे शेअर गिफ्ट म्हणून देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे कालच, 21 फेब्रुवारी 2022 रोजी हे शेअर देण्यात आले आहेत. या सर्व कर्मचाऱ्यांसोबत वी. वैद्यनाथन यांचे अतिशय जवळचे संबंध आहेत. हा व्यवहार कुठल्याही विचाराधीन हेतुचा नसून ते सेबीच्या नियमानुसार रिलेटेड पार्टीही नसल्याचं बँकेनं स्पष्ट केलं आहे. 

दरम्यान, रुक्मिणी सोशल वेल्फेयर ट्रस्टने सोशल एक्टिविटीजसाठी 2 लाख इक्विटी शेयर देऊ केले आहेत. बँकेने म्हटले की, याप्रमाणे एकूण आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेडचे एकूण 11 लाख इक्विटी शेयर गिफ्ट आणि समाजिक दायित्वातून देण्यात आले आहेत. 

टॅग्स :बँकबँकिंग क्षेत्रगिफ्ट आयडियाशेअर बाजार