Lokmat Money > बिझनेस न्यूज > Indian Railways : रेल्वेने रात्रीच्या प्रवासाचे नियम बदलले, आता असे कृत्य करणारांची खैर नाही!

Indian Railways : रेल्वेने रात्रीच्या प्रवासाचे नियम बदलले, आता असे कृत्य करणारांची खैर नाही!

यासंदर्भात प्रवाशाकडून तक्रार करण्यात आल्यास रेल्वे अशा लोकांविरोधात कारवाई करेल. हा निर्णय प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी घेण्यात आला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2022 03:40 PM2022-01-21T15:40:03+5:302022-01-21T15:41:49+5:30

यासंदर्भात प्रवाशाकडून तक्रार करण्यात आल्यास रेल्वे अशा लोकांविरोधात कारवाई करेल. हा निर्णय प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी घेण्यात आला आहे.

If any passenger make disturbance for co-passenger in night Indian railway will take action | Indian Railways : रेल्वेने रात्रीच्या प्रवासाचे नियम बदलले, आता असे कृत्य करणारांची खैर नाही!

Indian Railways : रेल्वेने रात्रीच्या प्रवासाचे नियम बदलले, आता असे कृत्य करणारांची खैर नाही!

नवी द‍िल्‍ली - भारतीय रेल्वेकडून (Indian Railways) ट्रेनमध्ये प्रवास करण्याच्या नियमांमध्ये वेळोवेळी बदल केले जातात. रेल्वेने केलेल्या नियमांची संपूर्ण माहिती आपल्याकडे असायला हवी. यावेळी रेल्वेने, रात्रीच्या वेळी प्रवाशांना (Night Journey) होत असलेला झोपेचा त्रास लक्षात घेत काही नियम केले आहेत. यामुळे आता रात्रीच्या वेळी प्रवाशांना झोपेसंदर्भात त्रास होणार नाही.

न‍ियम लागू -
यासंदर्भात india.com ने दिलेल्या वृत्तानुसार, हे नवे नियम तात्काळ लागू करण्यात आले आहेत. नव्या न‍ियमांनुसार, आता तुमच्या जवळचा कुणीही प्रवासी (Train Passenger) मोबाइलवर मोठ्याने बोलू शकणार नाही आणि त्याला मोठ्याणे गाणेही ऐकता येणार नाही. यासंदर्भात प्रवाशाकडून तक्रार करण्यात आल्यास रेल्वे अशा लोकांविरोधात कारवाई करेल. हा निर्णय प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी घेण्यात आला आहे.

आता अशी असेल रात्रीच्या 10 वाजताची गाइडलाइन -
- कुणीही प्रवासी मोठ्याने बोलणार नाही अथवा मोबाईलवर मोठ्या आवाजात म्यूझिक ऐकणार नाही.
- रात्रीच्या वेळी सहप्रवाशाची झोप खराब होऊ नये, म्हणून नाइट लाइट वगळता इतर सर्व लाइट बंद करावे लागतील.
- ग्रुपमध्ये प्रवास करणारे प्रवासी आता ट्रेनमध्ये रात्री उशिरापर्यंत गप्पा मारू शकणार नाहीत. कारण आता सहप्रवाशाने तक्रार केल्यास कारवाई होऊ शकते. 
- रात्रीच्या वेळी चेकिंग स्‍टॉफ, आरपीएफ, इलेक्ट्रीशन, केटरिंग स्‍टॉफ आणि मेंटनन्स स्‍टॉफ शांतपणे काम करेल.
- 60 वर्षांवरील प्रवासी, दिव्‍यांग प्रवासी आणि एकट्याने प्रवास करणाऱ्या महिलांना रेल्वे स्‍टाफ आवश्यकता पडल्यास तत्काळ मदत करेल.
 

Web Title: If any passenger make disturbance for co-passenger in night Indian railway will take action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.