Lokmat Money > बिझनेस न्यूज > ATM मध्ये कॅश अडकली तर सर्वात आधी करा 'हे' काम, अन्यथा...

ATM मध्ये कॅश अडकली तर सर्वात आधी करा 'हे' काम, अन्यथा...

ATM : आरबीआयच्या नियमांनुसार, खातेदाराने त्याच्या बँकेच्या एटीएम किंवा इतर कोणत्याही बँकेच्या एटीएममधून पैसे काढले आणि रोकड बाहेर आली नाही, परंतु खात्यातून पैसे कापले गेले, तर अशा परिस्थितीत जवळच्या कोणत्याही शाखेशी संपर्क साधा.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2022 01:58 PM2022-04-07T13:58:59+5:302022-04-07T14:02:49+5:30

ATM : आरबीआयच्या नियमांनुसार, खातेदाराने त्याच्या बँकेच्या एटीएम किंवा इतर कोणत्याही बँकेच्या एटीएममधून पैसे काढले आणि रोकड बाहेर आली नाही, परंतु खात्यातून पैसे कापले गेले, तर अशा परिस्थितीत जवळच्या कोणत्याही शाखेशी संपर्क साधा.

if cash gets stuck in atm then do this work first otherwise you will lose money | ATM मध्ये कॅश अडकली तर सर्वात आधी करा 'हे' काम, अन्यथा...

ATM मध्ये कॅश अडकली तर सर्वात आधी करा 'हे' काम, अन्यथा...

नवी दिल्ली : आजच्या काळात बहुतांश लोक पैसे काढण्यासाठी एटीएमचा (ATM) वापर करतात. पण अशा बातम्या तुम्ही अनेकदा ऐकल्या असतील की, पैसे काढताना एटीएममध्येच पैसे अडकतात. अशा परिस्थितीत अनेकजण घाबरून पुन्हा एटीएम मशीनमधून पैसे काढण्याचा प्रयत्न करतात. या परिस्थितीत तुम्हाला घाबरून जाण्याची गरज नाही. जर तुमच्यासोबतही असे घडत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. 

बँकेशी असा साधा संपर्क
आरबीआयच्या नियमांनुसार, खातेदाराने त्याच्या बँकेच्या एटीएम किंवा इतर कोणत्याही बँकेच्या एटीएममधून पैसे काढले आणि रोकड बाहेर आली नाही, परंतु खात्यातून पैसे कापले गेले, तर अशा परिस्थितीत जवळच्या कोणत्याही शाखेशी संपर्क साधा. जर बँक बंद असल्यास बँकेच्या कस्टमर केअरला फोन करून यासंबंधीची माहिती द्या. तुमची तक्रार नोंदवली जाईल. यासाठी बँकेला आठवडाभराचा अवधी मिळणार आहे.

ट्रान्झॅक्शन स्लिप जवळ ठेवा
एटीएममधून पैसे काढतेवेळी ट्रान्झॅक्शन फेल झाले असेल, परंतु तुम्ही त्याची स्लिप ठेवली पाहिजे. त्यामुळे स्लिप काढायला विसरू नका. काही कारणास्तव स्लिप काढली नाही, तर तुम्ही बँकेला स्टेटमेंटही देऊ शकता. ट्रान्झॅक्शन स्लिप महत्त्वाची आहे कारण ती बँकेकडून एटीएम आयडी, स्थान, वेळ आणि रिस्पॉन्स कोड प्रिंट असते.
 
बँकेला 7 दिवसांच्या पैसे परत करावे लागतील
अशी प्रकरणे लक्षात घेऊन आरबीआयने विशेष मार्गदर्शक तत्त्वे तयार केली आहेत. त्यानुसार, अशा प्रकरणांमध्ये बँकेला 7 दिवसांच्या आत ग्राहकांना पैसे परत करावे लागतील. जर बँकेने तुमचे पैसे एका आठवड्याच्या आत परत केले नाहीत, तर तुम्ही त्यासाठी बँकिंग लोकपालशी संपर्क साधू शकता. जर बँक 7 दिवसांच्या आत ग्राहकांना पैसे परत करू शकली नाही, तर त्यानंतर बँकेला ग्राहकांना दररोज 100 रुपये द्यावे लागतील.

Web Title: if cash gets stuck in atm then do this work first otherwise you will lose money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.