नवी दिल्ली :
कर्मचाऱ्यास कामावरून काढून टाकल्यानंतर त्याला रीतसर तसे कळविण्याचे सौजन्यही गुगलकडून दाखविले जात नसल्याचा आरोप होत असून कार्यालयात गेल्यानंतर ‘ॲक्सेस पास’ टेस्टमध्येच त्यांना ही बाब कळत असल्याचे निदर्शनास आले आहे.
गुगलच्या न्यूयॉर्क कार्यालयातील एका कर्मचाऱ्याने आपल्या लिंक्ड इन अकाैंटवर यासंबंधीचा खुलासा केला आहे. गुगलचे कर्मचारी सकाळी न्यूयॉर्क कार्यालयात आले आणि पास तपासणीसाठी रांगेत उभे राहिले. तपासणीत पासने हिरवा रंग दाखविला तर तुम्हाला कार्यालयात प्रवेश मिळेल. पासने लाल रंग दाखविला तर असे समजा की तुमची नोकरी गेली आहे. याचा गुगलच्या ब्रँडवर परिणाम होईल, असे कर्मचारी म्हणाला.