Lokmat Money > बिझनेस न्यूज > खुलासा न केल्यास पत्र

खुलासा न केल्यास पत्र

नोटाबंदीनंतर १८ लाख खात्यांमध्ये जमा झालेल्या ४.५ लाख कोटी रकमेबाबत प्राप्तिकर विभाग सध्या तपासणी करीत असून

By admin | Published: February 18, 2017 12:49 AM2017-02-18T00:49:56+5:302017-02-18T00:49:56+5:30

नोटाबंदीनंतर १८ लाख खात्यांमध्ये जमा झालेल्या ४.५ लाख कोटी रकमेबाबत प्राप्तिकर विभाग सध्या तपासणी करीत असून

If not disclosed the letter | खुलासा न केल्यास पत्र

खुलासा न केल्यास पत्र

नवी दिल्ली : नोटाबंदीनंतर १८ लाख खात्यांमध्ये जमा झालेल्या ४.५ लाख कोटी रकमेबाबत प्राप्तिकर विभाग सध्या तपासणी करीत असून, आतापर्यंत संदेश गेलेल्या १८ लाखांपैकी ७ लाख लोकांनी प्राप्तिकर विभागाला आपले म्हणणे कळविले आहे. उत्तरे आलेली नाहीत, त्यांना आता अवैधानिक पत्र पाठविले जाणार आहे.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, विभागाने आॅपरेशन क्लीन मनी सुरू केले असून, आतापर्यंत ७ लाख लोकांनी जमा रकमेबाबत उत्तर दिले आहे. उत्तर देणाऱ्या या ९९ टक्के नागरिकांनी हे मान्य केले आहे की, त्यांच्या खात्यांविषयीची आकडेवारी बरोबर आहे. मात्र यातील ५ लाख नागरिकांनी ई-फाईलिंग पोर्टलवर नोंदणी केली नाही. (वृत्तसंस्था)

Web Title: If not disclosed the letter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.