नवी दिल्ली : नोटाबंदीनंतर १८ लाख खात्यांमध्ये जमा झालेल्या ४.५ लाख कोटी रकमेबाबत प्राप्तिकर विभाग सध्या तपासणी करीत असून, आतापर्यंत संदेश गेलेल्या १८ लाखांपैकी ७ लाख लोकांनी प्राप्तिकर विभागाला आपले म्हणणे कळविले आहे. उत्तरे आलेली नाहीत, त्यांना आता अवैधानिक पत्र पाठविले जाणार आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, विभागाने आॅपरेशन क्लीन मनी सुरू केले असून, आतापर्यंत ७ लाख लोकांनी जमा रकमेबाबत उत्तर दिले आहे. उत्तर देणाऱ्या या ९९ टक्के नागरिकांनी हे मान्य केले आहे की, त्यांच्या खात्यांविषयीची आकडेवारी बरोबर आहे. मात्र यातील ५ लाख नागरिकांनी ई-फाईलिंग पोर्टलवर नोंदणी केली नाही. (वृत्तसंस्था)
खुलासा न केल्यास पत्र
By admin | Published: February 18, 2017 12:49 AM