Lokmat Money > बिझनेस न्यूज > चेकच्या रकमेपुढे Only लिहिलं नाही तर, चेक बाऊन्स होतो का, काय म्हणतो RBI चा नियम?

चेकच्या रकमेपुढे Only लिहिलं नाही तर, चेक बाऊन्स होतो का, काय म्हणतो RBI चा नियम?

आपण चेकवर रक्कम भरल्यानंतर त्याच्या पुढे ‘Only’ असंही लिहितो. पण, हे का करतो याची माहिती आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2023 11:27 AM2023-10-22T11:27:20+5:302023-10-22T11:27:39+5:30

आपण चेकवर रक्कम भरल्यानंतर त्याच्या पुढे ‘Only’ असंही लिहितो. पण, हे का करतो याची माहिती आहे का?

If only is not written after the cheque amount does the cheque bounce what does the RBI rule say know details | चेकच्या रकमेपुढे Only लिहिलं नाही तर, चेक बाऊन्स होतो का, काय म्हणतो RBI चा नियम?

चेकच्या रकमेपुढे Only लिहिलं नाही तर, चेक बाऊन्स होतो का, काय म्हणतो RBI चा नियम?

Bank Cheque Rules : लोकांना बँकिंग क्षेत्राशी जोडण्यासाठी सरकारनं अनेक पावलं उचलली आहेत. या कारणास्तव, आज देशातील बहुतांश लोकांची आज बँक खाती आहेत. लोककल्याणकारी योजनांअंतर्गत पात्र व्यक्तींना देण्यात येणारी अनुदानाची रक्कम आणि मदतही सरकार थेट त्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित करते. बँकेशी संबंधित व्यक्ती अनेकदा चेकदेखील वापरतात. तुम्हीही कधी ना कधी चेकचा वापर केला असेल. आपण चेकवर रक्कम भरल्यानंतर त्याच्या पुढे ‘Only’ असंही लिहितो. पण, हे करणं का महत्त्वाचं आहे हे तुम्हाला माहीत आहे का? रकमेच्या आधी ‘Only’ न लिहिल्यास चेक बाऊन्स होईल का? पाहूया या प्रश्नांची उत्तरं.

दरम्यान, सुरक्षेच्या कारणास्तव चेकवरील रकमेच्या पुढे ‘Only’ असं लिहिलेलं असतं. शब्दात लिहिलेल्या रकमेसमोर ‘Only’ असं लिहिल्यानं तुमच्या चेकची सुरक्षितता वाढते आणि हा शब्द चेकद्वारे होणाऱ्या फसवणुकीला आळा घालण्यास मदत करतो. ‘Only’ लिहिलेलं असल्यानं, तुम्ही ज्याला चेक देत आहात ती व्यक्ती तुमच्या खात्यातून चेक द्वारे अनियंत्रितपणे रक्कम काढू शकत नाही.

अशी होते सुरक्षा
समजा तुम्ही चेकद्वारे एखाद्याला ५० हजार रुपये देत आहात आणि शब्दात लिहिताना तुम्ही  ‘only’ असं लिहिलं नसेल तर तुम्ही लिहिलेल्या रकमेच्या पुढे लिहून एखादी व्यक्ती रक्कम वाढवू शकेल अशी शक्यता असते. अशा परिस्थितीत तुम्ही फसवणुकीचे बळी ठराल. त्याच वेळी, संख्यांमध्ये रक्कम भरताना, '/-' टाकणं आवश्यक आहे. जेणेकरुन समोर जागा उरणार नाही आणि त्यात कोणी जास्त रक्कम टाकू शकणार नाही.

चेक बाऊन्स होतो का?
काही लोकांच्या मनात असा प्रश्न पडतो की जर कोणी चेकवर ‘Only’ लिहायला विसरलं तर चेक बाऊन्स होईल का? या प्रश्नाचं उत्तर नाही असं आहे. तुम्ही ‘Only’ लिहिलं नाही तरी चेकवर काहीही परिणाम होणार नाही, बँक तो स्वीकारेल. या विशेष शब्दाचा थेट संबंध चेकच्या सुरक्षिततेशी आहे.

Web Title: If only is not written after the cheque amount does the cheque bounce what does the RBI rule say know details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.