ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 1 - आजपासून सुरु झालेल्या नव्या आर्थिकवर्षापासून स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांसाठी नवे नियम लागू केले आहेत. यापुढे स्टेट बँकेच्या खातेधारकांना अकाऊंटमध्ये नियमानुसार किमान (मिनिमम) बॅलन्स ठेवावाच लागेल. महानगर क्षेत्रातील ग्राहकांन कमीत कमी 5 हजार, शहरी भागातील ग्राहकांना 3 हजार आणि निम शहरी भागातील ग्राहकांना 2 हजार आणि ग्रामीण भागातील खातेधारकांना 1 हजार रुपये खात्यात ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे.
खात्यात मिनिमम बॅलन्स नसेल तर, दंड आकारला जाईल तसेच एका महिन्यात तीन वेळा खात्यातून रोकड रक्कमेचा व्यवहार केला तर, बँकेकडून 50 रुपये दंड आकारला जाईल. 31 कोटी खातेधारकांना या जाचक नियमांचा फटका बसणार असल्याचे एनडीटीव्हीने म्हटले आहे.
3 मार्चला बँकेच्या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या नोटीसनुसार खात्यात नियमानुसार बॅलन्सची रक्कम नसेल तर, जेवढी रक्कम आहे ती आणि आवश्यक बॅलन्स यामध्ये जी तफावत असेल त्यानुसार दंड आकारला जाईल.