Lokmat Money > बिझनेस न्यूज > Pension: जर तुमच्या नावावर असेल घर, तर तुम्हाला वृद्धापकाळात मिळेल पेन्शन, करावं लागेल केवळ हे काम

Pension: जर तुमच्या नावावर असेल घर, तर तुम्हाला वृद्धापकाळात मिळेल पेन्शन, करावं लागेल केवळ हे काम

Pension on Home: सेवानिवृत्तीनंतर पगार मिळणं बंद होतो. त्यात खासगी नोकरी करणाऱ्यांना तर पेन्शनसुद्धा मिळत नाही. हल्ली सरकारी नोकऱ्यांमध्येही  संविदेचे प्रमाण वाढू लागले आहे. अशा परिस्थितीत निवृत्तीनंतर उदरनिर्वाह कसा करावा हा प्रश्न लोकांना पडतो.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2022 05:35 PM2022-08-24T17:35:16+5:302022-08-24T17:36:06+5:30

Pension on Home: सेवानिवृत्तीनंतर पगार मिळणं बंद होतो. त्यात खासगी नोकरी करणाऱ्यांना तर पेन्शनसुद्धा मिळत नाही. हल्ली सरकारी नोकऱ्यांमध्येही  संविदेचे प्रमाण वाढू लागले आहे. अशा परिस्थितीत निवृत्तीनंतर उदरनिर्वाह कसा करावा हा प्रश्न लोकांना पडतो.

If the house is in your name, you will get pension in old age, only this work will have to be done | Pension: जर तुमच्या नावावर असेल घर, तर तुम्हाला वृद्धापकाळात मिळेल पेन्शन, करावं लागेल केवळ हे काम

Pension: जर तुमच्या नावावर असेल घर, तर तुम्हाला वृद्धापकाळात मिळेल पेन्शन, करावं लागेल केवळ हे काम

मुंबई - सेवानिवृत्तीनंतर पगार मिळणं बंद होतो. त्यात खासगी नोकरी करणाऱ्यांना तर पेन्शनसुद्धा मिळत नाही. हल्ली सरकारी नोकऱ्यांमध्येही  संविदेचे प्रमाण वाढू लागले आहे. अशा परिस्थितीत निवृत्तीनंतर उदरनिर्वाह कसा करावा हा प्रश्न लोकांना पडतो. या सर्व चिंता दूर करण्यासाठी बँकेने एक नवीन योजन आणली आहे. त्यामधून तुम्हाला चांगली पेन्शन मिळू शकते.

या योजनेचं नाव आहे रिझर्व्ह मॉर्गेज लोन स्कीम. या स्कीममध्ये घर बँकेकडे गहाण ठेवावे लागते. मात्र याचा अर्थ असा होत नाही की, बँक त्याचवेळी तुमच्या घरावर कब्जा करेल. तर घर तुमच्याकडेच राहील. मात्र त्यानंतर बँक वृद्ध दाम्पत्याला दर महिन्याला उदरनिर्वाहासाठी काही निश्चित रक्कम देत राहील. सोप्या भाषेत सांगायचं तर ही स्कीम होम लोनच्या अगदी उलट आहे. होम लोनमध्ये तुम्हाला दरमहा काही काही रक्कम जमा करावी लागते. तर या योजनेमध्ये बँक तुम्हाला दर महिन्याला पेमेंट करते.

हे कर्ज ज्यांचं वय ६० वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक आहे अशा सिनियर सिटिझनना मिळते. या योजनेतून दर महिन्याला खात्यामध्ये किती रक्कम येईल, ही बाब गहाण ठेवलेल्या घराची किंमत किती आहे त्यावर अवलंबून असते. सोप्या भाषेत सांगायचं तर जर तुमच्या घराची किंमत २५ लाख रुपये असेल तर बँक दरमहा तुम्हाल ५ हजार रुपये देऊ शकते. जर तुम्हाला एकरकमी पैशांची गरज असेल तर वैद्यकीय उपचारांसाठी अशी मदत घेता येऊ शकते. उल्लेखनीय बाब म्हणजे या योजनेमध्ये कर्ज घेण्यासाठी कुठल्याही किमान उत्पन्नाच्या पुराव्याची गरज नसते.

जेव्हा दाम्पत्याचा मृत्यू होतो तेव्हा बँक त्यांच्या मुलांना किंवा कायदेशीर वारसांना कर्ज जमा करण्याचा पर्याय देते. जर त्यांनी कर्जाची रक्कम जमा केली तर गहाण मालमत्ता त्यांना परत दिली जाते. मात्र कायदेशीर वारसांनी पैसे जमा केले नाहीत तर बँक घराचा लिलाव करते आणि त्यामधून वृद्धांना दिलेली रक्कम वजा करून उर्वरित रक्कम त्यांच्या वारसांना देते.  

Web Title: If the house is in your name, you will get pension in old age, only this work will have to be done

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.